Prakash Mahajan : दमानियांचा बोलवता धनी कोण? शिवसेना नेते प्रकाश महाजनांचा सवाल; केली ‘ही’ मोठी मागणी
Prakash Mahajan : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणातील सीडीआर समोर आणला. त्यांनी थेट राजकीय नेत्यांची नावे घेत कोणी कितीवेळा खरातशी संपर्क साधला याची माहिती दिली. यावरुन राजकारण तापले असून, शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Prakash Mahajan : अशोक खरात सीडीआर प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दमानिया यांनी दावा केला की, या प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते होते. त्यांनी विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव घेत, त्यांच्यात अनेक वेळा फोनवर संभाषण झाल्याचा आरोप केला आहे.
दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरात आणि शिंदे यांच्यात सुमारे 17 कॉल्स झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी दमानियांचा बोलवता धनी कोण असा सवाल उपस्थित केला आहे. Prakash Mahajan
Prakash Mahajan : दमानियांचा बोलवता धनी कोण? शिवसेना नेते प्रकाश महाजनांचा सवाल; केली ‘ही’ मोठी मागणी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चरित्रहनन करण्याचा एकमेव कार्यक्रम चालवला आहे. या कार्यक्रमाची सुपारी अंजली दमानिया यांनी घेतलेली आहे, असा गंभीर आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.
सामन्य माणसाला स्वतःचे कॅाल डिटेल्स काढायचे असतील तर खूप त्रास सहन करावा लागतो. या बाईने ज्या लोकांचे सीडीआर काढले असे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राजकीय नेत्याचे थेट नाव घेतले. त्यांनी सीडीओर कसे काढले? कोण हिला मदत करतंय? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
अंजली दमानियांनी टेलिफोन कंपन्यांशी कटकारस्थान करून हे सीडीआर मिळवले आहेत, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे. हा फार मोठा गुन्हा आहे. अंजली दमानिया यांनाचा ताब्यात घ्या, अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अशोक खरातची ईडीने चौकशी केली पाहिजे, असे देखील महाजन म्हणाले आहेत. Prakash Mahajan
आता या आरोपांवर अंजली दमानिया काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष असणार आहे.





