दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने दिल्लीतील स्थानिक मुद्यांवर भाष्य करत ती प्राधन्याने सोडवली जातील असा विश्वास दिल्लीकरांना होता. या मुद्यांवरच भाजपने दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकल्याचे सांगितले जात आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आता पाच वर्ष सत्तेपासून वंचित राहणार आहे. भाजपच्या दिल्लीतील विजयानंतर आता चर्चा सुरू आहे ती दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? यासाठी अनेक दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची नावे देखील माध्यमांमध्ये आली असून या शर्यतीत दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोणाच्या नावाची मोहर पक्ष नेतृत्व लावणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काही नावे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत….
प्रवेश वर्मा
नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अरविंद केजरीवाल यांना पराभवाची धूळ चाखायला लावणारे भाजपचे प्रवेश वर्मा हे जायंट किल्लर ठरले. ४७ वर्षीय वर्मा हे जाट समूदायातून येतात. त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली तर हरियाणा आणि राजस्थानमध्येही भाजपची लोकप्रियता वाढू शकते. तेच मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले जाते.
वीरेंद्र सचदेव
सचदेव हे भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपच्या पंजाबी लॅाबीचे ते प्रतिनिधित्व करतात. सचदेव यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभेची निवडणूक भाजपने लढवली होती. त्यामुळे वीरेंद्र सचदेव यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे.
विजेंद्र गुप्ता
विजेंद्र गुप्ता हे भाजपचे दिल्लीतील आमदार आहे. २०१५ ते २०२० मध्ये केजरीवाल यांच्या झंझावातामध्ये गुप्ता निवडून आले होते. दिल्लीतील भाजपचे संकटमोचक असे देखील गुप्ता यांना म्हटले जाते. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. यामुळे त्यांच्याही नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकतो.
खासदार बासुरी स्वराज व मनोज तिवारी
हे दोन्ही खासदार भाजपच्या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत. खासदार बासुरी स्वराज्य यांच्या मागे सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाची पुण्याई आहे. तर मनोज तिवारी हे पेशाने भोजपूरी गायक व अभिनेते आहेत. भाजपमधील तिवारी यांचे काम चांगले आहे. यामुळे या दोन्ही नावांच्या पर्यायाचा भाजप विचार करू शकतो.