Rhiya Ahir: पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहीर कोण? 27 वर्षीय मॉडेल एका क्षणात बनली आंदोलनाचा चेहरा!
Rhiya Ahir रिया अहीर ही मुंबईत राहणारी 27 वर्षीय मॉडेल आहे. ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर जवळपास एक लाख फॉलोअर्स आहेत. मॉडेलिंगसोबतच ती काही म्युझिक व्हिडिओंमध्येही झळकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने 'दिलबरा' या गाण्यावर तयार केलेला व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.

Rhiya Ahir: मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या 27 वर्षीय मॉडेल रिया अहीरची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तिचा पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहून ती रोखण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या एका कृतीमुळे रिया अहीर आंदोलनाचा प्रमुख चेहऱ्यापैकी एक बनली असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तिच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
दिल्लीत सुरू झालेल्या नीट पेपर लीक प्रकरणाविरोधातील आंदोलनाची लाट आता इतर राज्यांतही पोहोचली आहे. मुंबईतही विद्यार्थी आणि विविध संघटनांनी या मुद्द्यावर निदर्शने केली. याच आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले होते. त्यावेळी रिया अहीर अचानक पोलिसांच्या व्हॅनसमोर जाऊन उभी राहिली. दोन्ही हात पुढे करून तिने व्हॅन पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
रिया अहीर ही मुंबईत राहणारी 27 वर्षीय मॉडेल आहे. ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर जवळपास एक लाख फॉलोअर्स आहेत. मॉडेलिंगसोबतच ती काही म्युझिक व्हिडिओंमध्येही झळकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘दिलबरा’ या गाण्यावर तयार केलेला व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.

Rhiya Ahir
एका माध्यमाशी बोलताना रियाने त्या क्षणाचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी स्वतःला थांबवू शकले नाही. आंदोलनातील घोषणा ऐकून मी तिथे गेले. पोलिस आंदोलकांना व्हॅनमध्ये घेऊन जात असल्याचे पाहिले आणि मला ते योग्य वाटले नाही. म्हणून मी व्हॅनसमोर उभी राहिले. त्या क्षणी मी आतून खूप घाबरले होते, पण मी जे करत होते ते योग्य असल्याची खात्री होती.”
रियाचा हा फोटो आणि व्हिडिओ आता आंदोलनाचे प्रतीक मानले जात आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्ना, दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिचा फोटो शेअर करून तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. काही राजकीय नेत्यांनी आणि विविध पक्षांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरही तिचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप आहे. परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या आंदोलनाला देशभरातून विविध स्तरांवर पाठिंबा मिळत असून अनेक कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.
रिया अहीरने पोलिसांची व्हॅन रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती एका क्षणात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. तिच्या धाडसी कृतीचे काहींनी कौतुक केले, तर काहींनी तिच्या भूमिकेवर प्रश्नही उपस्थित केले. मात्र या घटनेमुळे रिया अहीर हे नाव देशभरात चर्चेत आले असून ती आंदोलनातील सर्वाधिक चर्चिलेल्या चेहऱ्यांपैकी एक ठरली आहे.





