पाकिस्तानची बोलती बंद करणाऱ्या कोण आहे पेटल गेहलोत? इटालियन गाण्याच्या व्हिडिओमुळे होत्या चर्चेत

Petal Gahlot | संयुक्त राष्ट्राच्या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू जल करारावरुन भारतावर हल्लाबोल केला होता. तसेच खोट दावे केले होते.
यावर भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी शनिवारी पाकिस्तानचा बुरखा फाडला. त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू जल कराराबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले बिनबुडाचे दावे खोडून काढले. पाकिस्तानला खडेबोल सुनावल्यामुळे गेहलोत सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर आरोप केल्यानंतर स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर देत म्हंटले की, “आज सकाळी या सभेने पाकिस्तानी पंतप्रधानांची हास्यास्पद नाटके पाहिली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा पुरस्कार केला, जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान ज्या विजयाबद्दल बोलत आहेत ते प्रत्यक्षात भारताने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या रनवेचे सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले फोटो आहेत”, असेपेटल गहलोत म्हणाल्या.
कोण आहेत पेटल गहलोत?
पेटल गहलोत यांचा जन्म दिल्लीत झाला आहे. मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी राजशास्त्राची पदवी तर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन मधून पदव्यूत्तर पदवी घेतली.
२०१५ साली त्या भारतीय विदेश सेवेत सामील झाल्या. पेटल या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रमुख राजनैतिक अधिकारी म्हणून काम करत आहेत. जुलै २०२३ मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये त्यांची प्रथम सचिव म्हणून नियुक्ती झाली.
संयुक्त राष्ट्र संघटनेत जाण्यापूर्वी पेटल यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन पश्चिमी विभागात सहसचिव म्हणून काम केले. पॅरिसमधील भारतीय मिशनमध्ये तसेच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात विविध पदांवर काम केलं आहे. Petal Gahlot |
The feeling of confusion, of being torn and of wanting everything and just one thing at the same time, encapsulated in this song from 12 years ago.
A cover of ‘Kabira’ from Yeh Jawaani Hai Deewani pic.twitter.com/ASs7usWki2
— Petal Gahlot (@petal_gahlot) May 5, 2025
उत्तम गिटार वादक
पेटल गहलोत उत्तम गिटार वादक आहेत, त्या गाणेही गातात. त्यांनी बॉलिवूडचीही अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळेच त्यांना गिटार डिप्लोमॅट असेही संबोधले जाते. त्यांनी इटलीचे प्रसिद्ध गीत ‘बेला चाओ’ हे गाणे गायले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. पाकिस्तानाला खडेबोल सुनावल्याने त्यांचे देशभरात कौतुक केले जात आहे.
हेही वाचा :
Health Benefits: आवळा आणि हळदीचे मिश्रण: हृदयासाठी लाभदायी, कोलेस्टेरॉल कमी करून नसांना ठेवते स्वच्छ





