Bhaskar Jadhav : मुंबईचे महत्व कमी करण्याचा हट्ट कोणाचा? भास्कर जाधव यांचा सवाल

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या पदरात काहीच पडले नाही, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा कोणाचा हट्ट आहे? हे कोणाचे स्वप्न आहे? संपूर्ण महाराष्ट्राने याचा विचार करावा या शब्दात शिवसेना उबाठा शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी शासनावर हल्ला चढविला. अर्थसंकल्पाच्या अनुदान मागण्यांवर बोलताना रस्ते व इतर कामे 64 हजार कोटींची सुरू करण्यात आली पण त्याकरिता मुंबई महापालिकेची डिपॉझिट मोडण्यात आली असा आरोपही त्यांनी केला.
नगरविकास विभागासाठी फक्त 10629 कोटींची तरतूद आहे पण मुंबईसाठी किती ?असा सवालही त्यांनी यावेळी केला. सिडकोने आर्थिक दुर्बल घटकांसाठी 420 घरे बांधली पण अधिका-यांनी त्याच्या जाहिरातींवर सातशे कोटी रुपये खर्च केले. ही घरे अत्यंत निकृष्ट असल्यामुळे त्यांची विक्री होत नाही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच सिडकोचा 4,430 कोटींचा खर्च वाया घालविणा-या शिवा रेड्डी या उप संचालकांची चौकशी व्हावी अशी मागणी जाधव यांनी यावेळी बोलताना केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात जाधवांनी 19हजार कोटींची तरतूद केली. मात्र कंत्राटदारांची 49 हजार कोटींची देणगी बाकी आहेत.ऐन निवडणूक तोंडावर तीन -तीन हजार कोटींची कामे 25ते 30 टक्के कमी टेंडर असता मंजूर करण्यात आली असा आरोप त्यांनी आपल्या भाषणांत केला. आपल्या मतदारसंघातील कामे या सरकारच्या काळात रोखण्यात येतात लोकशाही समृद्ध करायची असेल तर छोट्यात छोट्या पक्षांनाही सन्मान राखला पाहिजे असेही ते म्हणाले. कोकणातील साकव दुरुस्तीसाठी तरी निधी मिळावा अशी मागणीही जाधवांनी केली.





