“अमेरिका डोळे वटारत असताना पंतप्रधान चीनला चालले, जगात कुठली जागा नसेल…”; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
Updated On:

Uddhav Thackeray | इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याने ते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज (6 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणांवरून आणि उपराष्ट्रपती निवडणुकीवरून हल्लाबोल केला. उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आलं? ते सध्या आहे कुठं याची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे.
- अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहे. आपण त्यांना एका अक्षराने उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा. आपल्या देशाचं सरकार चालवतंय कोण?
- आज आपल्या देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे. आज जे आहेत ते भाजपाचे प्रचारमंत्री आहेत. डोनाल्ड ट्रम्प भारताची थट्टा करत आहेत, नरेंद्र मोदींची खिल्ली उडवत आहेत पण त्याला जाब विचारला जात नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी परराष्ट्र धोरणावरून भाजपावर घणाघात केला.
- पहलगाम हल्ल्यानंतर मोदी भारतात आले परंतु ते बिहारला प्रचाराला गेले. हे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत. सरकारची परराष्ट्र धोरणे अपयशी ठरली आहेत. अमेरिका डोळे वटारत असताना पंतप्रधान चीनला चालले, मित्रासाठी दरवाजे उघडावे म्हणून जात आहेत का हा प्रश्न आहे.
- पाकिस्तानशी जो संघर्ष आहे त्यामागे चीन असल्याचे बोलले जात आहे. मग आता चीनला का जात आहेत? आपले मित्र कोण हे सरकारने स्पष्ट करायला हवे. जगात अशी कुठली जागा नसेल तिथे आपले पंतप्रधान गेले नाहीत. हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये अपयशी ठरलं आहे.
- सरकारला नीतिमत्ता राहिली नाही. जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवता कामा नये. पाकिस्तानशी क्रिकेट खेळता कामा नये असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
- मणिपूर आजही जळत आहे. भाजप केवळ पक्ष फोडण्यामागे लागले आहे. देशाला मजबूत सरकार आणि मजबूत पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला मंत्री पाहिजे. जेव्हा देशावर आपत्ती येते तेव्हा हे लोक बेपत्ता होतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.
- स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याने उद्धव ठाकरे यांनी मग निवडणूक घेता कशाला? मत कुठं जातंय हे कळलं पाहिजे, असे म्हंटले.
- एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की, बाळासाहेबांना ज्यांनी विरोध केला त्या मार्गाने तुम्ही निघाले आहात. आम्ही लोक कल्याणकारी मार्गाने निघालो आहोत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी “त्यांचे विचार आणि त्यांना उत्तर द्यायला ते महान नाहीत. गद्दारांना मी किंमत देत नाही. त्यांच्या मालकांना ते भेटायला आले असतील तर त्यावर काय बोलू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
- आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. या मुद्द्यावर दुसऱ्यांनी चर्चा करण्याची गरज नाही आणि आमच्यासाठी समर्थ आहोत, असे राज यांच्या युतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा :
Actress Sheeba Chadha : “मुलांना जन्मालाच घालू नका”; हे काय बोलून गेली प्रसिद्ध अभिनेत्री





