Actress Sheeba Chadha : “मुलांना जन्मालाच घालू नका”; हे काय बोलून गेली प्रसिद्ध अभिनेत्री

Actress Sheeba Chadha : बॅालिवूड इंडस्ट्रीत अनेक नामांकित कलाकार आहेत. त्यांच्या विधनांची सतत चर्चा होत असते. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शीबा चड्ढा हिने एक विधान केलं आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर अभिनय करण्याअगोदर टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम केलं, त्यानंतर तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं.
शीबाने अत्यंत चोख आणि लक्षवेधक भूमिका साकारलेल्या आहेत. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शीबाने ‘सिंगल मदर’ (एकल मातृत्त्व) आणि त्यामुळे भेडसावणाऱ्या अडचणींविषयी सांगितलं आहे. शीबा खऱ्या आयुष्यातसुद्धा एका मुलीची आई आहे. परंतु, मुलीचं एकटीनेच पालनपोलष करणं खूप कठीण असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. सिंगल मदर होणं खूप कठीण आहे. प्रत्येक बाजूने हे खूप अवघड आहे. जरा काही झालं तरी तुम्हाला तुमच्या बाळासाठी उठून उभं राहावं लागतं, असं तिने सांगितलं.
मला असं वाटतं की मुलांना जन्मालाच घालू नये
मी प्रत्येक सिंगल मदरच्या दु:खाला खूप चांगल्याप्रकारे समजते. आधी बाळाची देखभाल करण्यासाठी खूप लोकं असायची. परंतु आता कुटुंब खूप छोटी आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होतात, अस मतं तिने एकल मातृत्वविषयी मांडलं. पुढे ती असं म्हणाली की मला असं वाटतं की आता मुलांना जन्मालाच घालू नये, तिच्या या विधानामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री शीबा चड्ढा दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायणम्’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : काजोलचे कमबॅक! ‘द ट्रायल सीझन २’ची खास अंदाजात केली घोषणा





