कोणत्या आदेशांच्या विरुद्ध अपील करता येणार नाही? (भाग-१)

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 252 अन्वये आणि कलम 251 अन्वये केलेले अपील किंवा पुनर्विलोकनासाठी केलेला अर्ज दाखल करून घेणाऱ्या आदेशाविरुध्द अपील दाखल करता येणार नाही. पुनरीक्षणासाठी किंवा पुनर्विलोकनासाठी केलेला अर्ज नाकारणाऱ्या आदेशाविरुध्द अपील दाखल करता येणार नाही. किंवा कार्यवाही स्थगित करण्यासाठी केलेला अर्ज नामंजूर करणाऱ्या, किंवा नाकारणाऱ्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करता येणार नाही. तथापि, फक्‍त राज्य शासनाला कोणत्याही आदेशात फेरफार करणे, त्याचे विलोपन करणे किंवा तो फिरवणे याचे अधिकार आहेत.

अपील दाखल करण्याचा शेवटचा दिवस सुट्टीचा दिवस असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 252 अन्वये, जेव्हा अपील किंवा पुनर्विलोकनासाठी अर्ज करण्यासाठी विहित मुदतीचा शेवटचा दिवस रविवार किंवा राज्य शासनाने मान्य केलेल्या इतर सुट्टीचा दिवस असेल तेव्हा, ती सुट्टी संपल्यानंतर लगतचा पुढील दिवस अपील करण्यासाठी शेवटचा दिवस आहे असे समजण्यात येते.

याच कायद्याच्या कलम 255 अन्वये, अपील प्राधिकाऱ्याला अपील दाखल करून घेता येईल किंवा अभिलेख मागविल्यानंतर आणि अपील करणाऱ्या व्यक्तीस आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर संक्षिप्तरीत्या ते फेटाळता येईल. परंतु, ज्यावेळी अपील मुदतबाह्य झाले असेल किंवा ते दाखल करता येत नसेल त्याबाबतीत अपील प्राधिकाऱ्यास अभिलेख मागविणे बंधनकारक असणार नाही. तसेच, दुय्यम अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या किंवा आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याकडून अशी कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात येणार नाही.

कोणत्या आदेशांच्या विरुद्ध अपील करता येणार नाही? (भाग-२)

जर अपील दाखल करण्यात आले असेल तर, त्याच्या सुनावणीचा दिनांक ठरविण्यात येईल व त्याबद्दलची नोटीस प्रतिवादीवर बजाविण्यात येईल. तसेच कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्यापुढे दाखल केलेली कोणतीही कार्यवाही ही, ज्या दिनांकास अशी कार्यवाही दाखल केली असेल त्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीच्या आत निकालात काढण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.