जुना किंवा नवा फ्लॅट कोणता पर्याय योग्य? (भाग-2)

जुना किंवा नवा फ्लॅट कोणता पर्याय योग्य? (भाग-1)

रिसेल फ्लॅटच्या देखभालीचा खर्च नेहमीच कमी असेल असे नाही. त्यात वाढ होण्याची शक्‍यताही राहते. जुन्या इमारतीची जर डागडुजी करायची असेल तर त्याचा खर्चही वाढू शकतो. अनेक रिसेल फ्लॅटमध्ये पार्किंगची पुरेशी सुविधा देखील उपलब्ध नसते.

नवीन तसेच जुने फ्लॅट खरेदी केल्याने होणारा फायदा आणि नुकसानीचा आढावा घेता येईल.

रिसेल फ्लॅट:
रिसेल फ्लॅटचा सर्वाधिक लाभ म्हणजे त्याचा ताबा मिळण्यासाठी वाट पाहावी लागत नाही.
चांगल्या लोकेशनवर चांगली मालमत्ता मिळते.
मालमत्ता बेकायदा असल्याचा धोका कमी राहतो.
मालकाला एकरकमी दिली जात असल्याने कोणताही छुपा कर आकारला जात नाही.
रिसेल फ्लॅटमध्ये बदलाची शक्‍यता राहत नाही.
इमारतीची डागडुजी करण्याची गरज भासते. पार्किंग असेलच असे नाही.

नवीन फ्लॅट
मजला, वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट निवडण्याची मूभा मिळते.
बांधकामस्थितीत असताना मनाप्रमाणे अंतर्गत बदल करता येतात.
गृहप्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण होईलच याची खात्री नाही.
फ्लॅटचा ताबा मिळणे, सोसायटीची नियुक्ती तसेच देखभाली खर्चाबाबत स्पष्टता राहत नाही.
फ्लॅटची एकूण किंमत सांगितली जात नाही. बराच पैसा छुप्या मार्गाने वसूल केला जातो.
फ्लॅटला महिनेच नाही तर वर्षानुवर्षे विलंब होऊ शकतो.

– किर्ती कदम

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×