जुना किंवा नवा फ्लॅट कोणता पर्याय योग्य? (भाग-1)

बहुतांश शहरात जमिनीची कमतरता आहे. त्यामुळे महानगरात टोलेजंग इमारतीत असणाऱ्या फ्लॅटला पसंती दिली जात आहे. घराच्या तुलनेने फ्लॅटची जागा कमी असते. अत्याधुनिक सुविधा असल्या तरी मोकळेपणा, हवेशीरपणा असतोच असे नाही. एकाच प्रकल्पात शंभर ते दोनशे फ्लॅट असतात आणि तेथे खासगीपणा अजिबात जपला जात नाही. मात्र जमीन न राहिल्याने नागरिकांना फ्लॅटशिवाय पर्याय राहिला नाही. दुसरीकडे जमीन खरेदी करुन त्यावर घर बांधण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. ग्रामीण भागात अद्यापही हा ट्रेंड लोकप्रिय असला तरी महानगरात स्वत: घर पाडून त्यावर अपार्टमेंट बांधणे किंवा रि-डेव्हलपमेंट करण्याची योजना आखली जाते. अशा स्थितीत फ्लॅट खरेदी करताना तो नवा असावा की जुना हा विचार आल्याशिवाय राहत नाही. सध्याच्या काळात बांधकामस्थितीतील योजनेत घर बुक करण्यापेक्षा रिसेल फ्लॅट घेणे फायद्याचे आणि हिताचे ठरत आहे.

मोठ्या शहरात आजही अनेक मंडळी नवीन योजनेत फ्लॅट बुक करण्यास पसंती देतात. कारण पैशाची जमवाजमव करण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि नव्या घरात मनासारखे बदल करता येतात. त्याचप्रमाणे वेळेचा अभाव असल्याने फ्लॅट खरेदी सोयीची आणि सुलभ प्रक्रिया मानली जाते. मुंबईसारख्या शहरात नवीन फ्लॅट बुक करण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या फ्लॅटची किंमत ही जुन्या फ्लॅटच्या तुलनेत कमी असणे. तसेच विकासक नवीन योजनेतून ग्राहकांवर ऑफरचा मारा करतात. म्हणूनच निर्माणधीन योजनेत फ्लॅट बुक करण्याकडे लोकांचा कल असतो. प्रि-लॉचिंग ऑफरमध्ये ग्राहकांना हप्त्यात सवलत, मोटार, पार्किंग सुविधा, जीएसटी सवलत दिली जाते. अशा स्थितीत जुने फ्लॅटच्या किंमती या नवीन फ्लॅटपेक्षा अधिक असतात. कारण जुन्या फ्लॅटचे असणारे प्राइम लोकेशन. जुने फ्लॅट हे शहराच्या मध्यवर्ती किंवा उपनगरात मोक्‍याच्या ठिकाणी असतात. रेल्वे स्थानक, बाजारपेठ, मेट्रो स्थानक, मॉल यासारख्या सुविधा चटकन उपलब्ध होतात. त्यामुळे जुन्या फ्लॅटची किंमत अधिक असते. रिसेल फ्लॅटचा आणखी एक फायदा म्हणजे त्याच्या देखभालीचा खर्च हा कमी असतो. तसेच त्याचे री-डेव्हलपमेंट देखील केले जावू शकते.

जुना किंवा नवा फ्लॅट कोणता पर्याय योग्य? (भाग-2)

नव्या फ्लॅटच्या तुलनेत जुने फ्लॅट हे आकाराने मोठे असतात. जर नव्या प्रकल्पासाठी जागा अपुरी असेल तर फ्लॅटचा आकारही कमीच राहू शकतो. परंतु जुने फ्लॅट हे प्रशस्त आणि हवेशीर असतात आणि मेटेनन्सही कमी राहतो. रेडी पझेशन किंवा जुन्या फ्लॅटचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा मिळणारा तात्काळ ताबा. निर्माणाधीन फ्लॅटला दोन ते तीन वर्षे वाट पाहवी लागते. एवढेच नाही तर ठरलेल्या मुदतीही फ्लॅटचा ताबा मिळत नाही. अशावेळी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

– किर्ती कदम

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×