Tara Sutaria: आधी ब्रेकअप आणि आता ड्रीम होम; तारा सुतारीयाने खरेदी केलं नवं घर
Tara Sutaria: तारा सुतारिया हिने 23 फेब्रुवारी 2026 रोजी इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली.

Tara Sutaria: अभिनेत्री तारा सुतारीया माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. एकीकडे तिच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच आता तिने आनंदाची बातमी दिली आहे.
ताराने तिचे पहिले घर विकत घेतले आहे. तिच्या घराची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने घर सुंदर फुलं आणि कॅण्डल्सने सजवले असून त्यामुळे घर अधिक आकर्षक वाटत आहे. ताराच्या या नव्या घरासाठी चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. Tara Sutaria:
तारा सुतारिया हिने 23 फेब्रुवारी 2026 रोजी इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले. या झलकांमध्ये ताराचे घर अतिशय सुंदर, शांत दिसत आहे. अभिनेत्रीने घराच्या एका कोपऱ्यात पियानोही ठेवला असून तिला पियानो वाजवायला खूप आवडते.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, तारा लवकरच ‘Toxic’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत यश, कियारा आडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Tara Sutaria:
हेही वाचा:






