कोणता सिनेमा बघणार? आरपार, दशावतार की बिन लग्नाची गोष्ट? त्या आधी हे नक्की वाचा…

Friday release : उद्या १२ सप्टेंबर या दिवशी मराठीत तीन सिनेमे रिलीज होत आहेत. आरपार, दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट. हे तीनही सिनेमे ताकदीचे आहेत. यामुळे चांगला प्रेक्षकवर्ग या सिनेमांना मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. खरंतर तिन्ही सिनेमांनी त्यांच्या प्रमोशनमध्ये कोणतही काटकसर केलेली नाही. यामुळे आता तिन्हीपैकी कोणत्या सिनेमाला प्रेक्षक जास्त पसंती देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आरपार
आरपार या सिनेमात लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास हा सिनेमा लव्हस्टोरीवर बेस आहे. या सिनेमात फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता ललित प्रभावळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रेमात अधलं मधलं काहीही नसतं ही टॅगलाइन सिनेमाला देण्यात आली आहे. यामुळे याचा अर्थ नेमका काय आहे, हे सिनेमा पाहिल्यानंतर समजेल. आरपार सिनेमाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
दशावतार
या सिनेमाची देखील मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हा सिनेमा कोकणातील नाट्यसंस्कृती दशावताराच्या निमित्ताने प्रेक्षकांना दाखविणार आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय भरत जाधव, महेश मांजरेकर या कलाकरांसह इतर अनेक कलाकार या सिनेमात आहेत. सिनेमाचा ट्रेलर उत्कंठावर्धक असल्याने प्रेक्षकांनी चांगली पसंती ट्रेलरला दिली आहे. याशिवाय या सिनेमात राखणदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हा राखणदार कोण आहे? त्याचा नेमका हेतू काय आहे? यासाठी हा सिनेमा पाहावा लागेल.
बिन लग्नाची गोष्ट
या सिनेमातील विषय जरा हटके आहे, याचं कारण लग्नाशिवाय दोघ एकत्र राहत आहेत. हे दोघे कोण तर अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. या दोघांची सिनेमात वेगळी नावे आहेत. प्रियाला सिनेमात प्रेग्नंट दाखविण्यात आलं आहे. लग्न करणं गरजेचं आहे का? या एका प्रश्नावर सिनेमाची कथा तयार करण्यात आलेली आहे. या सिनेमात या दोघांशिवाय अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेते गिरीष ओक यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा : सीबीआयला मोठे यश ! फरार मुनव्वर खानला कुवेतहून भारतात परत आणले





