महाराष्ट्राबाहेर कुठे झाली मराठी साहित्य संमेलने; वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : यावर्षी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे सुरु आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे.
यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ 1878 मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे 1878 मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे.
1909 – सातवे संमेलन बडोदा (गुजरात)
1917 – दहावे संमेलन मध्यप्रदेश इंदूर
1921 – अकरावे संमेलन बडोदा (गुजरात )
1928 – चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर
1929 – पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव
1930 – सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव
1931 – सतरावे संमेलन आंध्र प्रदेशातील हैदराबाद
1934 – विसावे संमेलन बडोदा गुजरात
1935 – एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर
1946 – 30 वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव
1947 – 31 वे संमेलन आंध्र प्रदेशातील हैदराबाद
1951 – 34 वे संमेलन कर्नाटकातील कारवार
1953 – 36 वे संमेलन गुजरात अहमदाबाद
1954 – 37 वे संमेलन दिल्ली
1961 – 43 वे संमेलन मध्यप्रदेश ग्वाल्हेर
1964 – 45 वे संमेलन गोव्यातील मडगाव
1967 – 47 वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ
1981 – 56 वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर
2000 – 73 वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव
2001 – 74 वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर
2015 – 88 वे संमेलन पंजाबमधील घुमान
2018 – 91 वे संमेलन गुजरातमधील बडोदा





