Ajit Pawars plane crash : “नेहमी सोबत असणारे पीए त्यादिवशी कुठे गेले होते?”, अजित पवारांच्या विमान अपघातावरून खासदाराकडून शंका उपस्थित
Ajit Pawars plane crash : दादा येतील आणि भेटतील असं सर्वांना वाटतं. हा प्रसंग अत्यंत दुःखाचा आहे, अशी भावना खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली.

Ajit Pawars plane crash : अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर काही नेत्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या अपघातावर बोलताना त्यांनी काही सवाल उपस्थित केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले सोनवणे?
“ज्यावेळी विमान अपघात झाला, त्यावेळी विमानात अजित पवारांचा पीए का नव्हता? नेहमी सोबत असणारे पीए त्यादिवशी कुठे गेले होते? त्यादिवशी फक्त सुरक्षारक्षकच सोबत होते. मी संशय व्यक्त केला आहे, आरोप केला नाही. मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे.
हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे, पुरावे देण्यासारखा विषय नाही, याची चौकशी व्हावी, असं मला वाटतं. झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री यांना मी भेटणार आहे. माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, याची चौकशी व्हावी असं मला वाटतं, कोणी आरोप करत नाही तर सर्वजण शंका व्यक्त करत आहेत,” असं बजरंग सोनवणे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे, मुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे. सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मला त्यांच्यावर विश्वास आहे, असंही यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.
तसेच देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजित पवारांना होती. दादा येतील आणि भेटतील असं सर्वांना वाटतं. हा प्रसंग अत्यंत दुःखाचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. Ajit Pawars plane crash
दरम्यान, बजरंग सोनवणे यांच्यासह अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. Ajit Pawars plane crash
हेही वाचा:
Pune ZP Election : आज ठरणार जिल्ह्याचे कारभारी! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतमोजणी







