Pune Crime News : सोशल मीडियावरून दहशत निर्माण करण्याचा प्रकार कधी थांबणार? खंडणी प्रकरणातील आरोपींचा रील व्हायरल

Pune Crime News : पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. याबाबत पुणे पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अनेकदा त्याचा परिणाम दिसून येत नाही. सोशल मीडियावर गुन्हेगारांना रिल्स बनवण्यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदी घातली आहे, असे असतानाही त्याचे पालन हे केवळ नामापुरतेच केले जात आहे का असा प्रश्न एका व्हायरल होणाऱ्या रिलीमुळे उपस्थित केला जात आहे.
सिंहगड रोड परिसरातील दोन आरोपींना पोलिसांनी खंडणीच्या आरोपांवर अटक केली होती. आरोपांना अटक केल्यानंतर रिल्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दादा मोरे (वय २२, वडगाव बु.) आणि किरण शिंदे (वय २४) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केलेली पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
View this post on Instagram
आरोपींच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सिंहगड रोड पोलिस ठाणे दिसत आहे. एकजण बंदूक हातात घेऊन उभा असल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही समाजात ‘हीरो’ बनून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, असे बोलले जात आहे.
बांधकाम व्यावसायिकाला धमकी
सिंहगड रोड परिसरात एका बांधकाम व्यवसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याची घटना घडली होती. व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून ५० हजारांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली होती.
हेही वाचा : Satara News : पावसाचं थैमान..! साताऱ्यातील 239 शाळांना महिनाभर सुट्टी, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय





