Pune : नराधमाच्या ‘मुसक्या’ आवळणार कधी? ; कोण आहे दत्तात्रय गाडे, Crime Record आला समोर

पुणेः स्वारगेट एसटी डेपोतील तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली आहे. मात्र, अद्यापर्यंत आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आरोपीने पीडित तरुणीवर बंद असलेल्या बसमध्ये एकदा नाही तर दोन वेळा बलात्कार केल्याचा वैद्यकीय अहवाल ससून रुग्णालयाने दिला. आता या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविषयी तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
मैत्रीनीने दिली ही माहिती
गुन्हे शाखेने या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या १० मित्र मैत्रिणींकडून त्याच्या विषयी खडानखडा माहिती गोळा केली जात आहे. भोरमधील त्याच्या एका मैत्रिणी पोलिसांना त्याच्याविषयी माहिती देत दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रिणी होती. तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा सतत तिला सांगायचा, अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे.
या माहितीवरून आरोपीने या आधीही महिलांना त्रास दिला असावा तसेच अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, असा पोलिसांना दाट संशय आहे, त्यानुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. त्याच्या आई, वडील आणि भावाला पुण्यात पोलिसांनी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याही जबाब नोंदवून घेतला आहे.
कोण आहे दत्तात्रय गाडे?
दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुरचा. हा एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याची समोर आले झाले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी गाडे पोलीस असल्याचे भासवत होता. त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचारीही असल्याची माहिती आहे. त्यानुसार पोलीस त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
लिफ्टचा बहाणा अन्…
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर या अगोदर जबरी चोरीचे गुन्हे शिरुर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी दत्ता गाडे याच्यावर ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे दाखल आहेत. शिरूरमध्ये त्याचा राजकीय कार्यकर्ता त्याचा वावर आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून आई, वडील पत्नी दोन मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे.
आरोपीला पकडून देणाऱ्यास एक लाखांच बक्षीस
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांची १३ पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपीच्या मुसक्या आवळ्यात पुणे पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे आता आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.





