रणबीर कपूरच्या ‘धूम 4’ चित्रपटाचे शूटिंग कधी सुरु होणार? साऊथचा अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

Dhoom 4 | अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या यशानंतर चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच त्याच्या ‘धूम 4’ चित्रपटाबाबत अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिल 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या रणबीर मुंबईत संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग करत आहे. यात त्याच्यासोबत विकी कौशल आणि आलिया भट्टही काम करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर ‘धूम 4’मध्ये नव्या लुकमध्ये दिसणार आहे. सध्या तो आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग करत आहे. याशिवाय तो नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटातही भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, ‘धूम 4’ च्या प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. प्रॉडक्शन टीम सध्या या चित्रपटासाठी दोन मुख्य अभिनेत्री आणि एका खलनायकाला कास्ट करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी साऊथच्या सुपरस्टारला कास्ट करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सूर्या यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यशराज फिल्म्सच्या सुपरहिट ‘धूम’ फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात जॉन अब्राहमसह अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा होते. यानंतर 2006 मध्ये ‘धूम 2’ आला, ज्यामध्ये हृतिक रोशनसोबत अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा होते. तर 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘धूम 3’मध्ये आमिर खान, अभिषेक आणि उदय होता. Dhoom 4 |
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘ॲनिमल पार्क’च्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे. याशिवाय ‘रामायण’ चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. तर रणबीरचा रोमँटिक-ड्रामा ‘लव्ह अँड वॉर’ 20 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे .Dhoom 4 |





