Asim Sarode : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा अंतिम निकाल कधी लागणार? अखेर असीम सरोदेंनी स्पष्टचं सांगितलं म्हणाले…
Asim Sarode : सुनावणीदरम्यान त्यांनी विविध कायदेशीर मुद्दे आणि दाखले न्यायालयासमोर मांडत उद्धव ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

Asim Sarode : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी लागणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात असून, उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा युक्तिवाद नुकताच पूर्ण झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सुनावणीदरम्यान त्यांनी विविध कायदेशीर मुद्दे आणि दाखले न्यायालयासमोर मांडत उद्धव ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. (Asim Sarode)
आता या प्रकरणाच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात होणार असून, पुढील युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या बाजूने केला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादाची कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Asim Sarode)
असीम सरोदे यांचा संभाव्य निकालाबाबत अंदाज (Asim Sarode)
दरम्यान, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी या प्रकरणाच्या संभाव्य निकालाबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आगामी सुनावणी आणि निकालाच्या कालावधीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला असून, या न्यायालयीन कामकाजात असीम सरोदे हेही त्यांच्या बाजूने सहायक म्हणून सहभागी झाले होते.
शिवसेना सत्तासंघर्ष सुनावणी मध्ये एकनाथ शिंदे व फुटीर आमदारांच्या तर्फे अनेक जेष्ठ वकील युक्तिवाद करणार आहेत. जेष्ठ वकील नीरज किशन कौल हे मुख्यतः बाजू मांडतील व सोबतच जेष्ठ वकील मुकुल रोहतगी, जेष्ठ वकील मनिंदर सिंग, जेष्ठ वकील महेश जेठमलानी तसेच जेष्ठ वकील हरीश साळवे हे सुद्धा…
— Asim Sarode (@AsimSarode) September 2, 2026
सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या बाजूने अनेक ज्येष्ठ वकील युक्तिवाद करू शकतात. ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे मुख्यतः बाजू मांडतील, तर त्यांच्यासोबत मुकुल रोहतगी, मनिंदर सिंग, महेश जेठमलानी आणि हरीश साळवे हेही युक्तिवादासाठी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये मोठ्या घडामोडी” (Asim Sarode)
या प्रकरणाच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना असीम सरोदे यांनी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असे गृहीत धरल्यास निकालासाठी पुढील महिना उजाडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा अंदाज असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल नेमका कधी येणार आणि तो कुणाच्या बाजूने लागणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





