आलिया भटचा ‘जिगरा’ OTTवर कधी रिलीज होणार?

Jigra OTT Release | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा ‘जिगरा’ चित्रपट रिलीज झाला आहे. यातील आलियाच्या अभिनयाने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज होणार आहे. त्याबद्दल एक अपडेट समोर आलं आहे.
फिल्म बीटच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सने ‘जिगरा’चे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. हा सिनेमा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. जिगरा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करू शकतो. मात्र अद्याप निर्मात्यांनी किंवा प्लॅटफॉर्मने त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केले नाही.
दरम्यान, आलिया आणि द आर्चीज फेम वेदांग रैना यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सत्या (आलिया भट) आणि तिचा भाऊ अंकुर (वेदांग रैना) यांच्याभोवती फिरतो. धर्मा प्रॉडक्शन आणि इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन यांनी मिळून सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान, अभिनेत्री दिव्या खोसलाने काही दिवसांपूर्वी आलिया भटच्या ‘जिगरा’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून गंभीर आरोप केले होते. यानंतर करण जोहरने देखील नाव न घेता एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दिव्या आणि करण यांच्यातील वाद आणखी वाढला आहे.





