“जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा…; अमृता फडणवीसांच्या ‘बिगडे नवाब’च्या टीकेला मलिकांच्या लेकीचे सडेतोड उत्तर

मुंबई : मुंबईतील ड्रग्स प्रकरणाला सध्या वेगळेच वळण मिळाल्याचे दिसत आहे. माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिकांनी केला होता. तसेच मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. दरम्यान याप्रकरणी आता फडणवीस आणि नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडूनदेखील टीका करण्यात येत आहेत.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिका यांच्या टीकेला कवितेतून उत्तर दिले होतं. त्यानंतर आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खानने उत्तर दिले आहे. जर काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील असा इशाराच त्यांनी दिला आहे.
बिगड़े नवाब ने-
प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स,
प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स,
प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई-
लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई,
लक्ष्य इनका एक ही है,मेरे भई-
बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई!#NawabMalik— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 9, 2021
“बिघडलेल्या नवाबांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,” असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.
If there aren’t any hidden skeletons in 1’s closet, press conferences shouldn’t bother them. When u have the truth by ur side, fear seldom has any hold. If there are any malicious intentions, they will be exposed. Our only agenda should be the growth & progress of Maharashtra. https://t.co/8F0lDbn1XC
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 9, 2021
“जर आपल्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे,” असे उत्तर निलोफर यांनी अमृता फडणवीसांच्या ट्वीटला दिलं आहे.
याआधी नवाब मलिकांवर हल्लाबोल करताना अमृता फडणवीसांनी ‘पुरुष असाल तर माझ्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका,’असे म्हटले होते.





