“जेव्हा ती आनंदी असते तेव्हा…”; हिना खानसाठी बॉयफ्रेंड रॉकीची खास पोस्ट

Hina Khan boyfriend Rocky Jaiswal | अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. मात्र सध्या हिना कॅन्सरशी लढा देत असून यावेळी ती जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करत आहे. यातच आता हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालने तिच्यासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रॉकीने हिनाचे फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, “जेव्हा ती हसते तेव्हा सगळं प्रकाशमय होतं. जेव्हा ती आनंदी असते तेव्हा आयुष्याला अर्थ राहतो. जेव्हा ती माझ्यासोबत असते, मी आणखी जास्त जगतो. जेव्हा मी तिच्यासोबत असतो, मला दुसरं काहीही नको असतं. आज तिचा आवडता पदार्थ बनवला. वीकेंड स्पेशल फॉर माय लव्ह.” रॉकी जैस्वालच्या या पोस्टवर चाहत्यांनीही त्याचं कौतुक केले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून हिना आणि रॉकी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हिनाने कॅन्सरमध्ये केस गळण्याआधीच ते कापले. यादरम्यानचा व्हिडिओही तिने शेअर केला होता. याशिवाय तिने इंस्टारग्रामवर पोस्ट शेअर करत केमोथेरपीमुळे आपल्या शरीरावर झालेल्या खुणा तिने दाखवल्या होत्या. सध्या हिना लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील तिला आधार देत आहेत. तसेच या आजाराशी हिना, धीटपणे, सकारात्मकरित्या लढत असल्याचे पाहून अनेकजण तिचे कौतुक करत आहे.
हेही वाचा:





