Irfan Pathan : “तू कब से बाप बन गया?”, गैरवर्तन करणाऱ्या आफ्रिदीला इरफान पठाणने सर्वांसमोर लगावली होती चपराक

Irfan Pathan slam Shahid Afridi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये नेहमीच तणाव आणि उत्साह असतो. मात्र, मैदानाबाहेरही काही खेळाडूंच्या वागणुकीमुळे वाद निर्माण होतात. अशीच एक घटना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघड केली. २००६ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने इरफानशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण इरफानच्या सडेतोड उत्तराने आफ्रिदीला सर्वांसमोर अपमानित व्हावे लागले.
‘तू कबसे बाप बन गया?’
इरफान पठानने सांगितले की, २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ कराचीहून लाहौरला विमानाने जात होते. यावेळी शाहिद आफ्रिदी इरफानच्या सीटजवळ आला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, “बच्चे, कैसा है?” आफ्रिदीच्या या वागणुकीने इरफान चिडला. त्याने तात्काळ प्रत्युत्तर देत म्हटले, “बच्चों जैसी हरकत तेरी है, तू कबसे बाप बन गया? ना मेरी तुमसे दोस्ती है, ना जान-पहचान, फिर बदतमीजी क्यों?” इरफानच्या या स्पष्ट आणि सणसणीत उत्तराने आफ्रिदी अवाक् झाला आणि त्याला काही बोलता आले नाही.
‘त्याने कुत्र्याचे मांस खाल्ले आहे, म्हणूनच तो भुंकतोय’ –
जब फ्लाइट में किसी बात को लेकर शाहिद अफरीदी पर गुस्साए इरफान पठान ने बुरा सुना दिया. पूरा मामला क्या था?
पूरी बातचीत- https://t.co/yqVR25vYSG@saurabhtop @IrfanPathan #GITN #Interview #IrfanPathan #ShahidAfridi pic.twitter.com/HMuE0pCPCo
— The Lallantop (@TheLallantop) August 16, 2025
इरफानने पुढे सांगितले की, विमानात तो पाकिस्तानी अष्टपैलू अब्दुल रझाकसोबत बसला होता. त्याने रझाकला विचारले की, पाकिस्तानात कोणत्या प्रकारचे मांस मिळते. यावर इरफानने रझाकला आणि आफ्रिदीला ऐकू जाईल अशा रीतीने म्हटले, “कदाचित याने (आफ्रिदीने) कुत्र्याचे मांस खाल्ले आहे, म्हणूनच तो भुंकतोय.” इरफानचा हा टोमणा ऐकून आफ्रिदी संतापला, पण त्याला काहीही प्रत्युत्तर देता आले नाही.
हेही वाचा – Irfan Pathan : रोहित शर्मामुळे इरफान पठाण आयपीएलच्या कॉमेंट्रीतून बाहेर पडला ? स्वतः केला खुलासा म्हणाला…
या घटनेने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त वर्तनावर प्रकाश टाकला आहे. मैदानावरील त्याच्या कामगिरीबरोबरच त्याच्या मैदानाबाहेरील वागणुकीमुळेही तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. इरफान पठानच्या या खुलाशाने चाहत्यांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.





