‘बप्पीदांच्या सोन्याच्या दागिन्यांचं अखेर काय करणार?’, मुलाने केला मोठा खुलासा….

मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण यापैकी काही कलाकार असेही आहेत जे ट्रेंड सेटर ठरले आहेत. अशाच ट्रेंड सेटरपैकी प्रसिद्ध एक नाव म्हणजे “बप्पी लहिरी…’ आज बप्पी लहरी आपल्यात नाही. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना 16 फेब्रुवारी 2022 रोजी बप्पी लहरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते.
बप्पी दा हे त्यांच्या गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांबद्दल असणाऱ्या आवडीसाठीही चर्चेत असायचे. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय करणार? याबद्दल त्यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी एक माहिती दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
बाप्पा लहरी म्हणाले… “बप्पी लहरीसाठी यांच्यासाठी सोनं घालणं हे फक्त फॅशन स्टेटमेंट नव्हतं. सोनं त्यांच्यासाठी लकी होतं. व्हॅटिकन सिटीपासून हॉलिवूडपर्यंत त्यांनी जगभरातील प्रत्येक भागातून सोनं गोळा केलं. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार, सर्व ठिकाणचं सोनं गोळा करून त्याचे दागिने घातले.”
त्यांनी दागिन्यांशिवाय कधीही प्रवास केला नाही. पहाटे 5 वाजता फ्लाईट असली तरी ते सर्व सोनं घालायचे. ते त्या सोन्याशी दागिण्यांशी आध्यात्मिकरित्या जोडलेले होते. त्यामुळे आम्ही ते जपून ठेवणार आहोत. सोनं ही त्यांची सर्वात आवडती गोष्ट होती. लोकांनी त्यांच्या वस्तू पाहाव्यात अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही त्या संग्रहालयात ठेवू. त्यांच्याकडे शूज, सनग्लासेस, टोपी, घड्याळं आणि दागिन्यांचं कलेक्शन होतं, ते त्यांच्या चाहत्यांना पाहता यावं म्हणून ते जपून ठेवू आणि त्याचं प्रदर्शन भरवू..’ असं बाप्पा लहरीने सांगितलं.
दरम्यान, बप्पी लहिरी यांचा पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. 1973 मध्ये त्यांनी ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली. 1976 मध्ये आलेल्या विशाल-आनंद यांच्या ‘चलते-चलते’ चित्रपटातून बप्पी दा यांना ओळख मिळाली. बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला पार केला आहे. 500 पेक्षा जास्त गाणी त्यांनी कंपोज केलीत आणि स्वत:साठी एक लीजंड किताब मिळवला आहे. पॉप म्युझिकला बॉलिवूडचा एक महत्वाचा भाग बनवण्याचं श्रेय बप्पी लहरी यांना जातं.






