Jayant Patil : फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? अखेर जयंत पाटलांनी मौन सोडलं, रात्री नेमकं काय घडलं?
Jayant Patil : याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता इतर कोणताही पक्ष एनडीएत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मात्र, काल मंगळवार १४ जुलै रोजी रात्री एक मोठी घडामोड घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.
या तिन्ही नेत्यांची अचानक झालेली भेट आणि त्यानंतर झालेल्या बैठकीनंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कशासाठी घेतली होते. याबाबत भाष्य केलं आहे. माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, वर्षानिवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते, असे सांगितले आहे.
Satara: राज्य सरोगसी व सहाय्यक प्रजनन तंत्र मंडळाच्या सदस्यपदी डॉ. समता माने
जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांसोबत भेट झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही नेते वर्षावर होते, याची माहितीदेखील नव्हती असे ते म्हणाले आहेत.
भेटीचं कारण काय? जयंत पाटील म्हणाले….
नेमकी मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी घेतली याचं कारण जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, ” माझा आणि प्रफुल पटेल तटकरे भेटीचा संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरवल्या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री साडे दहा वाजता वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि पावणे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलो. मुख्यमंत्र्यांची ५ मिनिटं चर्चा करून बाहेर पडलो.” असं एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
आमदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची चर्चा
दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १० पैकी ९ आमदारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत त्यांनी भाजपसोबत जाण्याची चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मुंबईत भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत जयंत पाटील यांची बैठक झाली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने तसेच याचवेळी पटेल-तटकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणे हा केवळ योगायोग म्हणावा का की पडद्याआड दुसरंच काहीतरी सुरू झालं आहे. याचीच जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Satara: कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार





