विराट कोहलीच्या पबवर बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल नेमकं कारण काय ?

Fir Against Virat Kohlis Pub One8 Commune । बेंगळुरू पोलिसांनी विराट कोहलीच्या मालकीच्या वन8 कम्युन पब आणि एमजी रोडवरील इतर अनेक आस्थापनांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती डीसीपी सेंट्रलने वृत्तसंस्थेला दिली आहे.
डीसीपी सेंट्रल सांगितले,’रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा पब सुरु होते. तसेच या पबमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहे. पब फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, त्यानंतर नाही. बेंगळुरमधील एमजी रोड परिसरात असलेला विराट कोहलीचा वन8 कम्युन पब चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमजवळ आहे. या पबकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजत असल्याच्या तक्रारीही आमच्याकडे आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
6 जुलैच्या रात्रीनंतर कारवाई करण्यात आली
कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) असे नमूद केले आहे की, 6 जुलै रोजी वन8 कम्यून-बेंगळुरू नियोजित बंद वेळेच्या 20 मिनिटांनंतर, म्हणजे पहाटे 1:20 पर्यंत ग्राहकांना सेवा देत असल्याचे आढळले. कामकाजाच्या वेळेचे उल्लंघन केल्यामुळे पबविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
रात्रीच्या गस्तीवर तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाला वन8 कम्युन रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे सूत्रांकडून समजते. सकाळी 1:20 वाजता पोहोचल्यावर, उपनिरीक्षकांनी पुष्टी केली की पब अजूनही ग्राहकांना सेवा देत आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विराट कोहलीच्या One8 Commune च्या दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता सारख्या इतर मेट्रो शहरांमध्येही शाखा आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेंगळुरू शाखा सुरू करण्यात आली होती. हे रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे





