Zing Movie Teaser : तमाशा म्हणजे काय? झिंग सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, व्हिडीओ पाहा…

Zing Movie Teaser : महाराष्ट्राचा लोककलेचा सांस्कृतिक ठेवा म्हणून तमाशा या लोककलेकडे पाहिलं जातं. पण या तमाशाच्या जागा आता अॅास्क्ट्राने घेतली आहे. तमाशा या लोककलेला घेऊन मराठीत अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत. अगदी ब्लॅक अॅन्ड व्हाईटपासून ते आताच्या कलर्सच्या जमान्यातही अनेक सिनेमा तमाशा या लोककलेला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहेत.
आता तमाशाा या लोककलेला घेऊन आणखी एका सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचं टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तमाशा म्हणजे काय? तर तमाशा हा विविध रंगांनी, ढंगांनी, रसांनी नटलेला असतो. तमाशा म्हणजे चरचरीत लावणी, ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंगी नार…! हे शब्द या सिनेमाचा टीझर सुरू झाल्यानंतर कानी पडतात.
थोडक्यात तमाशा नेमका काय आहे, याची कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवासांपूर्वीच झिंग या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकात वाढली आहे.
View this post on Instagram
झिंग या सिनेमात किशन नावाच्या पात्राभवती फिरणारी कथानक तयार करण्यात आलं आहे. वडिलांचं तमाशाचा फड उभारण्याचे अपूर्ण स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी किसनची सुरू असलेली धडपड या सिनेमात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे झिंंग या सिनेमात शशांक शेंडे सोडले तर सर्वच कलाकार नवोदित आहेत. यामुळे आता या सिनेमाची आतुरने प्रेक्षक वाट पाहतात आहेत. १९ सप्टेंबरपासून झिंग हा सिनेमात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमित वाल्मिक कोळी यांनी केलं आहे. तर लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा : तेलंगणात मोठी राजकीय घडामोड ! केसीआर यांनी मुलीची पक्षातून केली हकालपट्टी ; पक्षविरोधी कारवायांचा आरोप





