पुणे जिल्हा | एटीएम, पेटीएम म्हणजे काय?
आळेफाटा, (वार्ताहर) – शालेय दशेतच बँक कारभाराची माहिती मिळावी, बँक कशी चालते, बँकेतच पैसे का ठेवावे, ते सुरक्षित कसे असतात, बँक कर्ज कसे वाटते, एटीएम म्हणजे काय, पेटीएम म्हणजे काय? हे सर्व प्रकार कसे वापरावयाचे याबाबतची माहिती थेट बँकेत जात वडगाव आनंद (ता. खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली.
महाराष्ट्र शासनाचा एक चांगला उपक्रम म्हणून ज्या उपक्रमाकडे पहिले जाते, तो उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा होय. या उपक्रमामुळे राज्यातील प्राथमिक शाळांना या निमित्ताने उजाळा मिळताना दिसुन येत आहे. या विशेष उपक्रमामुळे शालेय व्यवस्थापन कमिटी, शिक्षक, लोकनेते या सर्वांच्या प्रयत्नातून खरे अर्थाने सीएसआर निधी व इतर सर्व प्रकारचे निधी जमा करून जणू काय शाळांमध्ये बक्षीस मिळविण्याकामी मोठी स्पर्धा चाललेल्या दिसून येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वडगाव आनंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया व लालला अर्बन को-ऑप.बँक मर्यादित आळेफाटा शाखा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट देत माहिती घेतली.
याप्रसंगी सेंट्रल बँकेचे आळेफाटा शाखेचे शाखा व्यवस्थापक पवन ढाले, इंद्रनील मोरे, धनंजय कुमार, अशोक अनांतरे तर लाला अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष अजाब, मुकुंद धीमटे, हरिष रोकडे, राहुल बोर्हाडे, लता इंगळूनकर, दत्ता बांगर, राजाराम सहाणे यांनी विशेष सहकार्य करत पवन धाले व संतोष अजाब यांनी मुलांच्या मनातील सर्व शंका दूर करत बँक व्यवहाराची माहिती दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, मनीषा इले, वृषाली कालेकर, संगीता कुदळे, गौरी डुंबरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश चौगुले, सचिन देवकर, व्रजेश पटेल, शिक्षणतज्ञ सदस्य डी. बी. वाळूंज हे देखील उपस्थित होते.





