Amitabh Bachchan : BIG B यांना काय झालं? रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Amitabh Bachchan : मात्र, यानंतर त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

Amitabh Bachchan underwent surgery : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. बच्चन यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे.
शस्त्रक्रियेनंतर बच्चन यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. याविषयी स्वतः बिग बी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
पोस्टमध्ये शस्त्रक्रिया नेमकी कशाची झाली याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, यानंतर त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. (Amitabh Bachchan)
आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा काळ सर्वात कठीण असल्याचं त्यांनी स्वतःच्या ब्लॉगमधून सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर उपचारांबाबत माहिती देताना लिहिलं की, “शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालो होतो. त्यानंतर ICU मध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. अखेर डिस्चार्ज मिळाला आणि घरी परतलो.” (Amitabh Bachchan)
पुढे त्यांनी लिहिलं, “रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा काळ हा सर्वात आव्हानात्मक असतो. शारीरिक, मानसिक आणि दैनंदिन आयुष्याशी पुन्हा जुळवून घेण्याचा हा टप्पा खूप कठीण असतो.” अमिताभ बच्चन यांनी नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली आहे याविषयीचा खुलासा केला नसल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या चाहत्यांची फिरकी घेत क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या ब्लॅागच्या माध्यमातून ते FIFA स्पर्धेतील सामन्यांवर सातत्याने प्रतिक्रिया देत होते. (Amitabh Bachchan)
खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक, फुटबॉलबद्दलचा उत्साह आणि विविध विषयांवरील मतं ते ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त करत असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कोणालाही कल्पना नव्हती. (Amitabh Bachchan)
अशातच त्यांच्या शस्त्रक्रियेची आणि ICU मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ८२ वर्षांचे झाले असूनही अमिताभ बच्चन याही वयात मनोरंजन विश्वामध्ये सक्रिय असतात.






