Amitabh Bachchan: सध्या सोशल मीडियावर “झुरळ” हा शब्द मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी एका संदर्भात “झुरळ” हा शब्द वापरल्यानंतर त्यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर तर “झुरळ जनता पार्टी” नावाचं पेजही व्हायरल झालं. या सगळ्या चर्चांदरम्यान आता एक जुना पण भन्नाट किस्सा पुन्हा समोर आला आहे. हा किस्सा आहे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोड़पति’मध्ये सांगितलेल्या झुरळाच्या गोष्टीचा. ‘केबीसी १६’च्या एका भागात बंगळुरूची प्रणती नावाची स्पर्धक हॉट सीटवर बसली होती. गप्पांच्या ओघात कोळ्याचे आठ पाय कसे मोजतात, यावर चर्चा सुरू झाली. त्यावर त्या स्पर्धकाने मजेशीरपणे “झुरळाचंही तसंच कन्फ्युजन असतं” असं म्हटलं. यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक भन्नाट अनुभव सांगायला सुरुवात केली आणि संपूर्ण सेटवर हास्यकल्लोळ उडाला. (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन म्हणाले की त्यांना झुरळाची खूप भीती वाटते. “झुरळ इतकं तगडं असतं की काही केलं तरी मरत नाही,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे एक प्रयोग केल्याचाही किस्सा सांगितला. त्यांनी एका बाटलीत पाणी आणि झुरळ मारायचं पावडर टाकलं आणि त्यात एक झुरळ बंद केलं. त्यांना वाटलं आता ते नक्की मरेल. पण आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी बाटलीचं झाकण उघडलं, तेव्हा सर्वात आधी तेच झुरळ बाहेर आलं. हा किस्सा ऐकून प्रेक्षक आणि स्पर्धक जोरात हसू लागले. Cockroach Janata Party हा प्रसंग पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर झुरळावर सुरू असलेली चर्चा. अनेक जण झुरळाला जिद्दीचं प्रतीक मानत आहेत. “कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणारा प्राणी” अशी त्याची ओळख सांगितली जात आहे. (Amitabh Bachchan) याचबरोबर अमिताभ बच्चन यांचा ‘हम’ चित्रपटातील प्रसिद्ध “कीडा” डायलॉगही पुन्हा व्हायरल होत आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी समाजातील वाईट प्रवृत्तीवर भाष्य करणारा दमदार संवाद म्हटला होता. “दुनिया में दो तरह के कीड़े होते हैं…” या संवादाने त्या काळात मोठी लोकप्रियता मिळवली होती. चित्रपटात रजनीकांत आणि गोविंदा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ( Amitabh Bachchan) आज झुरळ चर्चेत असताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलेली ही मजेशीर कथा आणि त्यांचा जुना डायलॉग पुन्हा लोकांच्या आठवणीत आला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.