“तुम्हाला नेमका माझा प्रॉब्लेम काय आहे?”; पूजा हेगडे ‘त्या’ प्रश्नावरून पत्रकारावर संतापली

Pooja Hegde Angry | अभिनेत्री पूजा हेगडेचा ‘देवा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. यात अभिनेता शाहिद कपूर मुख्यभूमिकेत पाहायला मिळाला. मात्र एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून पूजा थेट पत्रकारावर संतापल्याचे पाहायले मिळाले.
एका पत्रकाराने ‘मोठ्या बॉलिवूड कलाकारांसोबत काम करायची संधी कशी मिळत गेली आणि यात नशिबाचा काही भाग होता का? की तुझ्या कामामुळे या भूमिका मिळाल्या आहेत?’ असा पूजाला प्रश्न विचारला होता. त्यावर पूजा म्हणते, “अर्थातच माझ्या कामामुळे या भूमिका मिळाल्या आहेत. या चित्रपटांच्या ऑफर्स मला देण्यामागे नक्कीच काहीतरी कारणं असतील.”
पुढे ती म्हणते, “जेव्हा तयारी आणि संधी या दोन्ही गोष्ट एकत्र येतात तेव्हा नशीब आपोआप खुलतं, असं म्हटलं जातं. माझ्याबाबतीत असंच काहीसं घडत असेल. जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्याचं सोनं करण्यासाठी मी खूप मेहनत करते. याला जर तुम्ही माझं नशीब म्हणत असाल, तर ठीक आहे,” असं पूजा म्हणते.
यावरही समाधान न झाल्याने पत्रकार पूजाला पुन्हा विचारतो, “तू चित्रपटांची निवड कशी करते? मोठा हिरो पाहून का?” हे ऐकल्यावर मात्र पूजा चांगलीच चिडते. “तुम्हाला नेमका माझा काय प्रॉब्लेम आहे”, असं ती रागात विचारते. त्यावर शाहिद “मनात त्याला सुद्धा तुझ्यासोबत काम करायची, डान्स करायची इच्छा असेल. त्याला तुझ्यासोबत दिसायचं असेल”, असं तो म्हणतो आणि पूजाला शांत करण्याचा प्रयत्न करतो.
पूजाने आतापर्यंत ‘किसी का भाई, किसी की जान’, ‘राधेश्याम’, ‘हाऊसफुल 4’, ‘मोहेंजोदारो’, ‘सर्कस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सलमान खान, रणवीर सिंह, शाहिद कपूर यासारख्या अभिनेत्यांसोबत झळकली आहे.
दरम्यान, 75 कोटी रुपयांचे बजेट असलेला ‘देवा’ हा चित्रपट 31 जानेवारी 2025 ला रिलीज झाला आहे. यामध्ये शाहिद कपूर, पूजा हेगडे, पावेल गुलाटी, कुब्रा सैत या कलाकारांची प्रमुख भूमिका असून, चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्रयूज यांनी केलं आहे.
हेही वाचा:
Rohit Pawar : कुस्तीची स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी: रोहित पवारांचा खोचक सवाल





