हिना खानवर चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव; रॅम्प वॉकदरम्यान नेमकं काय घडलं?

Heena Khan | अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सरवरील उपचार सुरू असतानाही तिने तिचं काम सुरू ठेवलं. नुकतंच तिने फॅशन डिझायनर कियायोसाठी रॅम्प वॉक केला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु यातील हिनाची अवस्था पाहून चाहत्यांनी तिच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
व्हिडिओमध्ये हिना अत्यंत आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसते. परंतु दोन पावलं पुढे जाताच तिच्या पायाखाली ड्रेस आला आणि ती अडखळली. त्यातून सावरत हिना थोडी पुढे आली, मात्र पुन्हा एकदा तिचा ड्रेस पायाखाली आल्याने ती अडखळली. मात्र तरीही तिने आत्मविश्वासाने वॉक पूर्ण केला. Heena Khan |
हिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कियायोने हिनासाठी अत्यंत सुंदर ड्रेस डिझाइन केला होता. काळ्या रंगाचा स्कर्ट आणि त्यावर कलरफुल टॉप असा हा ड्रेस होता. त्यावर हिनाने ऑक्सडाइज्ड दागिने परिधान केले होते.
View this post on Instagram
दरम्यान, हिनाने 2024 पोस्ट शेअर करत ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचे चाहत्यांना सांगितले होते. आधी सर्जरी आणि त्यानंतर किमोथेरपी घेत हिनाने उपचार सुरू ठेवले आहेत. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले होते. ज्याचा व्हिडिओही तिने पोस्ट केला होता. ती या गंभीर आजाराचा मोठ्या धाडसाने सामना करत आहे, हे पाहून अनेकांकडून तिचे कौतुक केले जाते. Heena Khan |
हिना खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ अशा मालिकांबरोबरच हिना ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोजमध्ये दिसली होती. Heena Khan |
हेही वाचा:
सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन; संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर





