Valmik Karad surrenders : वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्यापूर्वी नेमकं काय घडलं ?

पुणेः गेल्या २२ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात तीव्र संतापाची लाट आहे. अशातच बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन सेरेंडर केले आहे. त्या अगोदर कराडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओत त्याने खंडणीचा खोटा गुन्हा आपल्यावर दाखल करण्यात आला आहे. तसेच देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव आले होते. बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना अचानक कराडने पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला आहे.
खंडणीचा गुन्हा बीड पोलिसांकडे असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. कराड सीआयडीसमोर हजर होण्यापूर्णी एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये कराडने आपल्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हणत देशमुख हत्येमध्ये आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. बीड पोलीस वाल्मिक कराड याचा शोध घेत होते, पण तो अचानक पुण्यातील पाषाण रोडवर असलेल्या सीआयडी कार्यालयात शरण आल्याने आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. २२ दिवस फरार असल्याने कराडने अचानक अशी प्रकारे शरण केल्याने चर्चांणा उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीचे अधिकारी कराडची चौकशी करीत असून त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
….तर फाशीची शिक्षा द्याः कराड
व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड नेमकं काय म्हणाला, ” मी वाल्मिक कराड. केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी अॅाफिस पुणे पाषण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात निष्कर्ष समोर येतील त्यात मी जर दोषी दिसलो, तर मला फाशी द्या, ती मी भोगायला तयार आहे,” असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
- सुरूवातीला वाल्मिक कराड मध्य प्रदेश राज्यात असल्याचे सांगण्यात आले.
- त्यानंतर कराड महाराष्ट्रात असल्याचे वृत्त प्रसारित झाले.
- दोन दिवसांपासून कराड सरेंडर करणार असल्याची दोन दिवसांपासून चाललेली चर्चा.
- आज दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयाबाहेर वाल्मिक कराड याचे कार्यकर्ते एकत्रित आले.
- सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मीडिया प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
- सकाळी १० वाजता पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सीआयडी कार्यालयाबाहेर दाखल झाले होते.
- १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयाबाहेर येणार अशी माहिती देण्यात आली.
- दुपारी १२ वाजता वाल्मिक कराडने एक व्हिडिओ शेअर केला त्यात पुणे सीआयडीला सरेंडर करणार असल्याचे सांगितले.
- दुपारी सव्वाबारा वाजता कराड स्कॅार्पिओ या वाहनातून चेहरा लपवत सीआयडी कार्यालयात दाखल झाला.
- दुपारी १ वाजल्यापासून सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे वाल्मिक कराडची चौैकशी करीत आहेत.





