Bappi Lahiri : वडिलांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? मुलगा बाप्पा लहरीनं सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग

मुंबई – चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक ‘बप्पी लहरी’ यांनी नुकतंच या आपल्यातून निरोप घेतला आहे. बप्पी दा यांच्या आकस्मित निधनाने बॉलिवूडसह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. बप्पी लहरी यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आणि याचदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वडिलांच्या निधनानंतर मुलगा बाप्पा लहिरी आणि मुलगी रेमा लहिरी यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, नुकतंच झालेल्या एक मुलाखती मध्ये बाप्पा लहरी यांनी वडील बप्पी लहरी यांच्या मृत्यू बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. निद्रा श्वसनबाधा विकाराने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र बप्पी यांच्या मुलाने हे कारण नाकारलं. त्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं हे आता समोर आलं आहे.
याविषयी बाप्पा लहरी म्हणाला की…. ‘गेले महिनाभर वडिलांवर जुहू इथल्या क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना घरी जायची फार इच्छा होती. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांनी जेवण सोडलं आणि संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती आणखी बिघडली.
त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मी त्यावेळी सतत फोनद्वारे संपर्कात होतो…. मला असं वाटतं की वडिलांना श्वसनबाधा झाली नव्हती, त्याचं हृदय धडधडणं बंद झालं होतं. आणि याच कारणामुळे ते आम्हाला सोडून गेले. असं बाप्पा लहरी म्हणाला. हा सर्व प्रसंग सांगतेवेळी बाप्पा लहरी अतिशय भावुक झाले होते.
बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1953 झाला होता. 1973 सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण बप्पीदा खऱ्या अर्थाने 1982 मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आले. या चित्रपटातील त्यांची सर्वच गाणी प्रचंड गाजली आहेत. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे.





