मोदी सरकारला नेमकं काय हवे आहे? – रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली – काँग्रेसने रेल्वेचे भाडे आणि विना अनुदानित सिलिंडरचे किंमती वाढीवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रोज एक नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतेही प्रतिकिया देत नाही. म्हणून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे भाजप सरकारला खोचक प्रश्न विचारले आहे.
– रणदीप सुरजेवाला
सरकार आखिर चाह क्या रही है?
पहले:
• फ्लेक्सी टिकट फेयर से अनियंत्रित किराया वसूली!• रेलवे का निजीकरण!
• खान-पान महंगा!
• टिकट महंगा!
और अब ये!!! pic.twitter.com/07Kp1wf0qH
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 2, 2020
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला ट्विट केले आहे की,’सरकारला नेमकं काय हवे आहे? रेल्वेचे भाडे आणि विना अनुदानित सिलिंडरचे किंमती वाढीवरून तसेच वाढणाऱ्या महागाईवर लक्ष केले आहे, मोदी सरकारच्या काळात महागाई वाढत आहे आणि भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारातही वाढ होत आहे. असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.
तत्पूर्वी, रणदीप सुरजेवाला यांनी ‘हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सरकारमध्ये नोकर भरतीत घोटाळे होत आहे.’ असं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.’





