काय सांगता..! चक्क मोठ्या पोलीस बंदोबस्तातून चोरट्यांनी पळविली ‘दुचाकी’

नेवासा – राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांची नुकतीच नेवासा येथे सभा झाली. या सभेसाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या सभेदरम्यान नेवासाचे भाजप जेष्ठनेते दिनकरराव ताके – पाटील यांचे पुत्र अशोकराव ताके पाटील यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आली आहे.
अशोकराव ताके पाटील यांनी टिव्हीएस स्टार (क्रमांक एम.एच.१७ – बी.टी ०१८०) ही दुचाकी लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर लावली होती. या सभेला मोठ्या पोलीस बंदोबस्त असतांना सुद्धा चोरट्यांनी दुचाकी मोटारसायकल पळवून नेल्याची घटना बुधवारी (३१) रोजी घडली.
अशात आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभे दरम्यान पोलीस बंदोबस्तात दुचाकी चोरीला जात असेल तर इतरांची काय ? असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे सुञे हाती घेतल्यानंतर अनेक चोरीच्या घटना घडल्या आहे. चोरीच्या घटनांवर तपास लागत नसल्यामुळे पोलीसांच्या कामावर स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.





