काय सांगता.! ‘जवान’साठी किंग खानने आयुष्यात पहिल्यांदाच केलं ‘हे’ काम…

मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान सध्या अॅक्शनने भरलेल्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला, जो पाहिल्यानंतर चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाचा प्रिव्ह्यू 24 तासांत 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले.
‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा आणि दीपिकासुद्धा अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेते.
त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पहायला मिळतात. प्रीव्ह्यूची सुरुवातच शाहरुखच्या आवाजाने होते. यामध्ये दमदार अॅक्शन सीन्सचा तडका अनुभवायला मिळणार आहे. शाहरुखने सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्रू सदस्याचे आभार मानले. किंग खानच्या या प्रामाणिक वृत्तीवर चाहते फिदा झाले आहे.
दरम्यान, अभिनेता शाहरुख खानने नुकताच चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा अशा प्रकारचे सेशन घेताना दिसला.
त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्याने याच प्रकारचे सेशन घेतलं आहे. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, “असे कोणते काम आहे जे जवान चित्रपटामध्ये तुम्ही पहिल्यांदाच केले आहे? यावर शाहरुख खान हा म्हणाला की, “मी पहिल्यांदाच तमिळमध्ये गाण्याच्या काही लाईन म्हटल्या आहेत..’ असं किंग खान यावेळी म्हणाला.





