FDA कारवाई स्वारगेट : स्वारगेट बस स्थानकावरील अस्वच्छ कॅन्टीन FDAएकडून बंद! प्रवासी काय म्हणतात?

कॅन्टीनमधील भयानक अस्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ पाहून आयुक्तांनी हे कडक पाऊल उचलले. या धाडसी कारवाईनंतर स्वारगेट परिसरातील प्रवाशांनी मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

Updated On:
FDA कारवाई स्वारगेट :  स्वारगेट बस स्थानकावरील अस्वच्छ कॅन्टीन FDAएकडून बंद! प्रवासी काय म्हणतात?

पुण्यातील सर्वात गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शनिवारी रात्री धडक कारवाई करत ते थेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कॅन्टीनमधील भयानक अस्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ पाहून आयुक्तांनी हे कडक पाऊल उचलले. या धाडसी कारवाईनंतर स्वारगेट परिसरातील प्रवाशांनी मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. “एसटी स्टँडवरील कॅन्टीनमध्ये नेहमीच अस्वच्छ आणि शिळे अन्न दिले जाते, तसेच दरही अवाढव्य आकारले जातात; त्यामुळे ही कारवाई योग्यच आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, आता राज्यातील इतरही बसस्थानकांवर अशीच धडक मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली.

आणखी संबंधित बातम्या

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

2026-06-10 18:15:45

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

Cockroach Political Controversy : कॉकरोचमुळे देशभरात राजकीय वादळ! तरुणाई काय म्हणते...

2026-05-23 15:29:51

Cockroach Political Controversy : कॉकरोचमुळे देशभरात राजकीय वादळ! तरुणाई काय म्हणते...

Mountain Man Story : चक्क डोंगर फोडला.. ! 67 वर्षीय अवलियाने डोंगर फोडून तयार केला साडेतीन किमीचा रस्ता

2026-05-18 13:04:40

Mountain Man Story : चक्क डोंगर फोडला.. ! 67 वर्षीय अवलियाने डोंगर फोडून तयार केला साडेतीन किमीचा रस्ता

Pune Petrol Stock : पुण्यात पेट्रोलचा साठा कमी? सत्य परिस्थिती काय?

2026-05-16 14:38:15

Pune Petrol Stock : पुण्यात पेट्रोलचा साठा कमी? सत्य परिस्थिती काय?

Fuel Price Hike : इंधन दरवाढीचा महाविस्फोट.. ! देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

2026-05-16 14:21:49

Fuel Price Hike : इंधन दरवाढीचा महाविस्फोट.. ! देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ