“भाजप वाले दुर्गंध पसंत करतात म्हणून गोशाळा बांधतात; आम्हाला सुगंध आवडतो म्हणून….”, अखिलेश यादवांच्या वक्तव्यावरून नवा वाद

Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. परफ्यूम पार्क आणि गौशाळांवरून त्यांनी केलेल्या विधानावरून भाजपने समाजवादी पक्षाला घेरलं आहे. अखिलेश यादव म्हणाले होते, “भाजप वाले दुर्गंध पसंत करतात, म्हणून गौशाळा बांधतात; आम्हाला सुगंध आवडतो, म्हणून आम्ही परफ्यूम पार्क बनवतो.”
संबित पात्रांचा अखिलेश यांच्यावर निशाणा –
अखिलेश यादवांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि खासदार संबित पात्रा म्हणाले, “समाजवादी पक्ष सनातनच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतो. अखिलेश यादवांचं हे विधान स्पष्ट करतं की या लोकांना सनातनशी कोणताही लगाव नाही. जर हिंदुस्तानात राहून कोणी सनातनचा विरोध करत असेल, तर त्याने राजकारण सोडून द्यावं. हा देश सनातनचा अपमान सहन करणार नाही.”
दिनेश शर्मांचाही हल्लाबोल –
संबित पात्रांबरोबरच भाजपचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनीही अखिलेश यादवांवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, “तुम्ही गौशाळेत सुगंध-दुर्गंध का शोधता? गौशाळेत सनातनची श्रद्धा शोधा. अखिलेश यादवांच्या काळात गायींची कत्तल होत होती, पण योगीजींनी ती बंद केली. गाय ही आपली माता आहे आणि मातेवर टीका करणं बरोबर नाही.”
रवि किशन यांचं प्रत्युत्तर –
भाजप खासदार रवि किशन यांनीही अखिलेश यादवांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “आमच्या आईनेही गोबरावर चूल पेटवली होती, आम्ही तसंच जेवण खाल्लं आहे. आमच्या संस्कृतीत गोबर शुद्ध मानलं जातं. समाजवादी पक्ष 2027 च्या विधानसभा निवडणुकीत हरत असल्याने अखिलेश अशी वक्तव्यं करत आहेत.”
“आम्हाला विकास आणि समृद्धी हवी” – अखिलेश
योगी सरकारवर टीका करताना अखिलेश यादव म्हणाले, “आम्ही समाजवादी विकास आणि समृद्धीची अपेक्षा करतो. भाजपची ही दुर्गंधीयुक्त नफरत आहे. कन्नौजचे लोक, जे आपल्या सुगंधासाठी ओळखले जातात, त्यांनी ही दुर्गंध दूर करावी.”
अखिलेश यांच्या या टीकेला उत्तर देताना भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, “राणा सांगाचा अपमान केल्यानंतर आता सपा आणि अखिलेश यादव हिंदू श्रद्धेचा अपमान करत आहेत. गाय आणि गौशाळा दुर्गंध पसरवतात, असं ते म्हणतात. श्रीकृष्णांना गोपाल म्हणतात, ज्यांना गायींची सुरक्षा आणि काळजी घेण्याचं दैवी प्रेम होतं. वोट बँकेच्या तुष्टीकरणासाठी कोणी किती खाली पडू शकतं, हे लज्जास्पद आहे.”





