नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेच्यावेळी राहुल गांधी यांनी कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण त्या कुत्र्याने बिस्कीटे खाल्ली नाहीत, त्यानंतर राहुल गांधी यांनी ही बिस्कीटे कार्यकर्त्यांना दिली असा आरोप करीत भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालविय यांनी एक व्हिडीओ एक्सवर टाकला आहे. त्यावर राहुल गांधी चांगलेच भडकले असून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. कुत्र्यांनी भाजपचे काय नुकसान केले आहे असा सवाल करीत त्यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे.
या व्हिडीओच्या संबंधात बोलताना त्यांनी म्हटले आहे की न्याय यात्रेच्या ठिकाणी एका श्वान मालकाचा कुत्रा गाडीवर चढला होता. त्यामुळे मी त्याला बिस्कीट टाकले पण त्याने ते खाल्ले नाही. गर्दीमुळे हा कुत्रा भांबावून गेला असावा म्हणून त्याने कदाचित हे बिस्कीट खाल्ले नसावे. मग मी हा बिस्कीटचा पुडा त्याच्या मालकाच्या हातात दिला आणि तुमच्या हाताने तरी ते खातोय का हे बघा असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्या मालकाने त्याला बिस्कीट टाकल्यानंतर त्याने ते खाल्ले असं राहुल गांधी म्हणाले.
या प्रकारात वावगे काय झाले असा सवाल करीत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की कुत्र्यांनी भाजपचे काय नुकसान केले आहे समजत नाही. कुत्र्यांबाबत त्यांना काय प्रॉब्लेम आहे तेही समजत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अमित मालवीय आपल्या पोस्टमध्ये
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गेजी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि कुत्र्याने खाल्ली नाही तेव्हा त्यांनी तीच बिस्किटे आपल्या कार्यकर्त्याला दिली.एखाद्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यांसारखे वागवत असतील, तर असा पक्ष नामशेष होणे स्वाभाविक आहे. अशी पोस्ट शेअर करत मालवीय यांनी राहुल गांधींचा तो व्हिडीओ शेअर केला होता.
अभी कुछ दिन पहले कांग्रेस अध्यक्ष खड़गे जी ने पार्टी के बूथ एजेंटों की तुलना कुत्तों से की और यहाँ राहुल गांधी अपनी यात्रा में एक कुत्ते को बिस्किट खिला रहे हैं और जब कुत्ते ने नहीं खाया तो वही बिस्किट उन्होंने अपने कार्यकर्ता को दे दिया।
जिस पार्टी का अध्यक्ष और युवराज अपने… pic.twitter.com/70Mn2TEHrx
— Amit Malviya (@amitmalviya) February 5, 2024