नवी दिल्ली – भारतीय कुस्तीगिर महासंघाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी निवडून आलेल्या संजय सिंह यंनी आता थेट भारतीय क्रीडा मंत्रालयाविरुद्धच दंड थोपटले आहेत. मंत्रालयाने नव्या कार्यकारणीला निलंबित केल्यावरही आम्ही मंत्रालयाला मानत नाही अशी थेट भूमीका सिंह यांनी घेतली आहे.
आम्ही निवडून आलो आहोत व संपूर्ण प्रक्रीया पारदर्शीपणे झाली आहे. त्यात मंत्रालयाने केलेल्या कारवाईमुळे विनाकारण हस्तक्षेप होत आहे. आमची नवी कार्यकारणी येत्या काळात कुस्ती स्पर्धा घेणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Zagreb Open 2024 Wrestling : क्रोएशियातील स्पर्धेतून बंजरंगची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…
निवडणूक अधिकारी तसेच अन्य संबंधितांची या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यावर केंद्रिय क्रीडा मंत्रालय निलंबनाचा निर्णय कसा काय घेऊ शकते हे घटनाबाह्य आहे. आम्ही या विरोधात लढा देणार आहोत, असेही सिंह म्हणाले.