Santosh Trophy 2024-25 (Football) : पश्चिम बंगाल उपांत्य फेरीत दाखल, ओडिशावर केली मात…

Santosh Trophy 2024-25 ((West Bengal vs Odisha) ) : – पश्चिम बंगाल संघाने उपांत्यपूर्व फेरीत ओडिशा संघावर मात करताना संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम बंगाल संघाने स्पर्धेच्या 52 व्या वेळेस उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
Bengal take care of a fighting Odisha to make the penultimate round 🙌🏼#SantoshTrophy #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/tMAPF4KOi9
— Indian Football Team (@IndianFootball) December 26, 2024
गुरुवारी झालेल्या लढतीत पश्चिम बंगालने ओडिशाला 3-1 असे पराभूत केले. लढतीच्या 25 व्या मिनिटाला ओडिशा संघाच्या राकेश ओरमच्या मैदानी गोलच्या जोरावर ओडिशा संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती.
त्यानंतर मात्र पश्चिम बंगलाच्या नरोहरी श्रेष्ठ, रॉबी हसंदा यांनी गोल करताना बंगाल संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. राखीव खेळाडू असलेल्या मनोतास माजीने शेवटच्या काही मिनिटात गोल करताना संघाची आघाडी 3-1 अशी वाढविली, जी शेवटपर्यंत टिकवली.





