IND vs WI : भारताविरुद्ध पहिल्या डावात वेस्ट इंडिजची लज्जास्पद ‘शरणागती’, प्रथमच घडला असा कारनामा!

IND vs WI 1st Test 1st day : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये आजपासून भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. यजमान भारतासमोर वेस्टइंडीज संघाने पहिल्या दिवशीच पूर्णपणे शरणागती पत्करली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या वेस्टइंडीजचा डाव अवघ्या 44.1 षटकांत 162 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज असहाय ठरले.
बुमराह-सिराज जोडीचा दबदबा –
वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध भारतात कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वात कमी षटकांत बाद होणारा दुसरा परदेशी संघ ठरला. भारताविरुद्ध गेल्या 10 डावांमध्ये वेस्ट इंडिज फलंदाजांनी नव्या चेंडूचा सामना करताना केवळ एकदाच 100 षटकांपर्यंत टिकण्याची कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांचा खराब फॉर्म पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
वेस्ट इंडिजची पहिल्या डावात नीचांकी धावसंख्या –
Innings Break and that’s Tea on Day 1 of the 1st Test.
Kuldeep Yadav picks up the final wicket as West Indies is all out for 162 runs.
Scorecard – https://t.co/Dhl7RtjvWY #INDvWI #1stTEST #TeamIndia @IDFCfirstbank pic.twitter.com/n8WmaUC1OJ
— BCCI (@BCCI) October 2, 2025
पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव 44.1 षटकांत 162 धावांवर संपुष्टात आला. यापूर्वी, भारतात कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात परदेशी संघाला सर्वात कमी षटकांत बाद करण्याचा विक्रम 2019 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध नोंदवला गेला होता. त्या डे-नाइट कसोटी सामन्यात बांगलादेशचा डाव अवघ्या 30.3 षटकांत संपला होता.वेस्ट इंडिजकडून केवळ तीन फलंदाज काही काळ टिकाव धरू शकले. जस्टिन ग्रीव्हसने सर्वाधिक 32 धावा केल्या, तर शाय होपने 26 आणि कर्णधार रॉस्टन चेसने 24 धावांचे योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा –
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना टिकण्याची संधीच दिली नाही. मोहम्मद सिराजने 14 षटकांत 40 धावांत 4 बळी घेत सर्वाधिक प्रभाव टाकला. उपकर्णधार जसप्रीत बुमराहने 14 षटकांत 42 धावांत 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले. फिरकी गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवने 6.1 षटकांत 25 धावांत 2 बळी घेतले, तर वॉशिंग्टन सुंदरनेही एक बळी घेतला.
हेही वाचा – Mohsin Naqvi : ‘BCCI ची माफी मागितली नाही आणि कधीच मागणार नाही…’, मोहसिन नक्वींचा भारतीय मीडियावर हल्लाबोल
वेस्ट इंडिजचा खराब फॉर्म कायम –
वेस्ट इंडिजच्या भारतातील गेल्या 10 कसोटी डावांतील षटके पाहिल्यास त्यांचा संघर्ष स्पष्ट होतो: 57.2, 78.0, 54.1, 55.2, 47.0, 48.0, 50.5, 101.4, 46.1 आणि आजचे 44.1 षटके. भारतीय खेळपट्ट्यांवर नव्या चेंडूचा सामना करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. भारतीय संघाच्या या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच दिवशी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. आता भारताचा संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने खेळेल.





