AUS W vs NZ W : अॅशले गार्डनरने विश्वचषकात रचला इतिहास, शतक ठोकताच बनली ‘हा’ पराक्रम करणारी पहिली महिला खेळाडू!

Ashley Gardner Sets Historic Record in AUS W vs NZ W Match : 30 सप्टेंबर 2025 रोजी भारतात आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 चा शुभारंभ झाला. या स्पर्धेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये इंदूरच्या होल्कर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 49.3 षटकांत 326 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 237 धावांवर गारद झाला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अॅश्ले गार्डनरने शानदार शतकी खेळी करत महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला.
अॅश्ले गार्डनरने रचला ऐतिहासिक विक्रम –
न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 113 धावांवर चार गडी गमावले होते. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अॅश्ले गार्डनरने एका बाजूने डाव सांभाळताना धावगतीही वाढवली. तिने ताहलिया मॅकग्रा आणि किम गार्थ यांच्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत डावाला आकार दिला. गार्डनरने 83 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि एका षटकारासह 115 धावांची खणखणीत खेळी केली. या शतकी खेळीमुळे ती महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासात क्रमांक 6 किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू ठरली.
Maiden hundred in the World Cup, and when it was needed the most on the biggest stage well done Ash! 🙌🏻❤️#AUSWvsNZW #AshleighGardner #CWC25 pic.twitter.com/EQuT18kgXm
— DAISY28 (@DAISYSIDDLE03) October 1, 2025
न्यूझीलंडविरुद्ध सर्वात मोठा स्कोअर –
ऑस्ट्रेलिया महिला संघाने या सामन्यात विश्वचषकातील तिसरा सर्वात मोठा स्कोअर उभारला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्ध महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा स्कोअर आहे. यासह ऑस्ट्रेलियाने 2017 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 9 गड्यांच्या मोबदल्यात उभारलेल्या 284 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दमदार कामगिरीने स्पर्धेची जोरदार सुरुवात झाली असून, न्यूझीलंडसमोर 327 धावांचे आव्हान आहे. गार्डनरच्या ऐतिहासिक खेळीने सामन्याला विशेष रंगत आली आहे.
हेही वाचा – Mohsin Naqvi : ‘BCCI ची माफी मागितली नाही आणि कधीच मागणार नाही…’, मोहसिन नक्वींचा भारतीय मीडियावर हल्लाबोल
अॅशले गार्डनरचे एक शतक, तीन आश्चर्यकारक कामगिरी –
- अॅशले गार्डनरचे हे शतक खास आहे. कारण हे क्रिकेट विश्वचषकातील तिचे पहिले शतक आहे.
- अॅशले गार्डनरचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे आणि ही दोन्ही शतके या वर्षी झाली आहेत.
- अॅशले गार्डनरची एकदिवसीय सामन्यांमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.





