West Bengal: पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालटाचे वारे? ; मतमोजणीच्या पहिल्या तासांत ट्विस्ट
West Bengal: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या एका तासामध्येच निकालात ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

West Bengal: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या एका तासामध्येच निकालात ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनूसार, भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम बंगालमधील सुरुवातीच्या कलांनूसार भाजप १०६ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस १०५ आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात आघाडी घेतली आहे.सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता जोरदार मुसंडी मारली आहे.
दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये नेमको कोणाची सत्ता येणार हे काही वेळातच समोर येणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा जागा असून, त्यापैकी २९३ जागांवर मतमोजणी सुरू आहे. मतदान दोन टप्प्यांत पार पडले. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४२ जागांसाठी मतदान झाले.
ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, तर भाजप यावेळी सत्तेसाठी लढत आहे. या निवडणुकीत सुमारे ९२ टक्के मतदान झाले. सर्वांचे लक्ष भवानीपूर मतदारसंघावर आहे, जिथे ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असून, त्यांना भाजपचे सुवेंदू अधिकारी आव्हान देत आहेत.





