West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर! बंडखोर गटालाच ‘खरा TMC’ म्हणून मान्यता; ऋतब्रत बॅनर्जींचे ममता बॅनर्जींना मोठे आवाहन
West Bengal Politics : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील राजकीय नाट्याला आता अधिकृत आणि कायदेशीर मान्यता मिळाली आहे.

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाला टीएमसीचा अधिकृत विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देण्याचा दावा स्वीकारला आहे. यासोबतच त्यांनी ममता बॅनर्जी यांना या विधिमंडळ पक्षाचे मुख्य सल्लागार म्हणून काम करण्याचे आवाहन केले आहे. (West Bengal Politics)
ऋतब्रत यांना पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित करत ५८ बंडखोर आमदारांनी आपल्या स्वाक्षऱ्यांचे पत्र विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांच्याकडे सुपूर्द केले होते. या ताज्या घडामोडीमुळे आता टीएमसीच्या विधिमंडळ पक्षाचे नियंत्रण पूर्णपणे बंडखोरांच्या हातात गेले आहे. (West Bengal Politics)
विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर विधानसभेतच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऋतब्रत म्हणाले, आमचा हा दावा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. पक्षाच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आपल्या मागे असल्याचा दावा करत त्यांनी स्पष्ट केले की, हा बंडखोर गटच आता सभागृहात खरा विरोधी पक्ष आहे. (West Bengal Politics)
टीएमसी विधिमंडळ पक्ष हा टीएमसीच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या ५८ आमदारांचा गट आहे. राज्याबाहेर असलेले आणखी दोन आमदारही त्यांच्या संपर्कात असून त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. ते अधिकृतपणे सामील झाल्यावर आमचे संख्याबळ आणखी वाढेल. (West Bengal Politics)





