\n

निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी –
\n

\nपश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी नवीन विधानसभा स्थापनेसाठीची अधिकृत अधिसूचना राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. फाल्टा येथील पुनर्मतदान वगळता उर्वरित २९३ जागांच्या विजयी उमेदवारांची यादी राज्यपालांना देण्यात आली असून, आता राज्यपाल नवीन विधानसभा स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करतील.

\n

“निवडणूक प्रक्रियेनंतर नवीन विधानसभा स्थापनेची यादी आम्ही राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा किंवा अन्य तांत्रिक बाबींशी निवडणूक आयोगाचा संबंध नाही, तो अधिकार राज्यपाल आणि राष्ट्रपतींचा आहे,” असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

\n

\"\"

\n

भाजपचा ऐतिहासिक विजय –
\n

\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने पहिल्यांदाच बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने अवघ्या १० वर्षांत ३ जागांवरून थेट २०७ जागांपर्यंत मजल मारली आहे. या निवडणुकीत भाजपला १३० जागांचा फायदा झाला असून, टीएमसीला १३५ जागांचे नुकसान सोसावे लागले आहे.

\n

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव –
\n

\nया निवडणुकीतील सर्वात हाय-व्होल्टेज लढत भवानीपूर मतदारसंघात पाहायला मिळाली. येथे भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मतांवर समाधान मानावे लागले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"West Bengal CM Oath: पश्चिम बंगालमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण जाहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्षांची माहिती","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/bjp-3.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-government-swearing-in-ceremony-brigade-parade-ground-9-may-bjp-samik-bhattacharya-update#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/bjp-3.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-government-swearing-in-ceremony-brigade-parade-ground-9-may-bjp-samik-bhattacharya-update#webpage","name":"West Bengal CM Oath: पश्चिम बंगालमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण जाहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्षांची माहिती","url":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-government-swearing-in-ceremony-brigade-parade-ground-9-may-bjp-samik-bhattacharya-update","inLanguage":"mr","description":"West Bengal CM Oath: या निवडणुकीतील सर्वात हाय-व्होल्टेज लढत भवानीपूर मतदारसंघात पाहायला मिळाली. येथे भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मतांवर समाधान मानावे लागले.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-government-swearing-in-ceremony-brigade-parade-ground-9-may-bjp-samik-bhattacharya-update#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/bjp-3.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-government-swearing-in-ceremony-brigade-parade-ground-9-may-bjp-samik-bhattacharya-update#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-government-swearing-in-ceremony-brigade-parade-ground-9-may-bjp-samik-bhattacharya-update","name":"West Bengal CM Oath: पश्चिम बंगालमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण जाहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्षांची माहिती"}}]}}}

West Bengal CM Oath: पश्चिम बंगालमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण जाहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्षांची माहिती

West Bengal CM Oath: या निवडणुकीतील सर्वात हाय-व्होल्टेज लढत भवानीपूर मतदारसंघात पाहायला मिळाली. येथे भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मतांवर समाधान मानावे लागले.

Updated On:
West Bengal CM Oath: पश्चिम बंगालमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण जाहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्षांची माहिती

West Bengal CM Oath: पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ घडवत भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली आहे. बंगालमधील नवीन सरकारच्या शपथविधीची तारीख आणि ठिकाण आता निश्चित झाले असून, येत्या ९ मे रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग –

समिक भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधीच्या एक दिवस आधी म्हणजेच उद्या संध्याकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावार शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजप संसदीय बोर्डाने विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सह-पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमित शाह ७ मे रोजी कोलकाता येथे पोहोचण्याची शक्यता असून, ते नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधतील.

निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी –

पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी नवीन विधानसभा स्थापनेसाठीची अधिकृत अधिसूचना राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. फाल्टा येथील पुनर्मतदान वगळता उर्वरित २९३ जागांच्या विजयी उमेदवारांची यादी राज्यपालांना देण्यात आली असून, आता राज्यपाल नवीन विधानसभा स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करतील.

“निवडणूक प्रक्रियेनंतर नवीन विधानसभा स्थापनेची यादी आम्ही राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा किंवा अन्य तांत्रिक बाबींशी निवडणूक आयोगाचा संबंध नाही, तो अधिकार राज्यपाल आणि राष्ट्रपतींचा आहे,” असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

भाजपचा ऐतिहासिक विजय –

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने पहिल्यांदाच बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने अवघ्या १० वर्षांत ३ जागांवरून थेट २०७ जागांपर्यंत मजल मारली आहे. या निवडणुकीत भाजपला १३० जागांचा फायदा झाला असून, टीएमसीला १३५ जागांचे नुकसान सोसावे लागले आहे.

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव –

या निवडणुकीतील सर्वात हाय-व्होल्टेज लढत भवानीपूर मतदारसंघात पाहायला मिळाली. येथे भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मतांवर समाधान मानावे लागले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

2026-09-22 13:45:57

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

Political News : कॉंग्रेसकडून अपयश लपवण्यासाठी नवे बहाणे; एसआयआरवरील टीकेवरून भाजपचा पलटवार

2026-09-21 22:43:47

Political News : कॉंग्रेसकडून अपयश लपवण्यासाठी नवे बहाणे; एसआयआरवरील टीकेवरून भाजपचा पलटवार

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

West Bengal Politics : निळं बॅकग्राउंड, मध्यभागी फुटबॉलपटू आणि तिरंग्याचा स्पर्श; ममता बॅनर्जी गटाने प्रसिद्ध केला नवा निवडणूक लोगो

2026-09-21 21:56:47

West Bengal Politics : निळं बॅकग्राउंड, मध्यभागी फुटबॉलपटू आणि तिरंग्याचा स्पर्श; ममता बॅनर्जी गटाने प्रसिद्ध केला नवा निवडणूक लोगो

Devendra Fadnavis : राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

2026-09-21 18:48:24

Devendra Fadnavis : राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती