Lal Krishna Advani : आडवाणी यांचे 100 व्या वर्षात होणार पदार्पण; भाजपकडून विशेष सोहळ्याचे आयोजन
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) उद्या (रविवार) वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्त भाजपने दिल्लीतील पक्ष मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Lal Krishna Advani : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) उद्या (रविवार) वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्त भाजपने दिल्लीतील पक्ष मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे.
सकाळी १० वाजता आयोजित सोहळ्यावेळी भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आडवाणी यांच्या कन्या प्रतिभा आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. पूजा आणि हवनाने सोहळ्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर आडवाणी (Lal Krishna Advani) यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या २० मिनिटांच्या व्हिडीओचे प्रसारण केले जाईल. त्यामध्ये आडवाणी यांच्या भाषणांचे काही महत्वाचे अंशही समाविष्ट असतील.
भाजपला देशातील महत्वाची राजकीय ताकद बनवण्यात आडवाणी यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. त्या योगदानाच्या गौरवासाठी आणि आडवाणी यांच्या अभीष्टचिंतनासाठी पक्षाने सोहळा आयोजित केला आहे. आडवाणी (Lal Krishna Advani) यांचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचे भाजपने म्हटले आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या भाजपच्या सोहळ्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.






