‘या’ कारणासाठी देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट ! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई – ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत राऊत यांचे स्वागत केले. त्यानंतर आज पहिल्यांदाच राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या परिवाराने खूप काही भोगले आहे. असे राजकारण देशात या आधी पाहिले नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
हे सरकार नक्कीच घटनाबाह्य आहे त्याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मी एका सरकारी कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असंही राऊत यावेळी म्हणाले. तुमची भूमिका नरमली आहे का ? असा सवाल माध्यमांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले मी खासदार आहे,माझा भाऊ देखील आमदार आहे काही सरकारी कामानिमित्त आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत,हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात एक राजकारणी दुसऱ्याला नेमहमीच भेटतो असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात नवीन सरकार बनले आहे. यादरम्यान सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. म्हाडाला घर देण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांनी घेतले हे चांगले निर्णय आहेत असं राऊत यावेळी म्हणाले. जेलमध्ये असताना मी विचार करत होतो,वीर सावरकर १० वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये कसे राहिले,लोकमान्य टिळक मंडालेमध्ये सहा वर्षाहून अधिक काळ कसे राहिले तसेच आणीबाणीच्या काळात अटल बिहारींसोबत इतर नेते जेलमध्ये कसे राहिले असतील राजकारणी व्यक्तीला कधी ना कधी जेलमध्ये जावेच लागते म्हणून मी जेलमध्ये गेलो असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
राऊतांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे
अनिल देशमुख यांच्याबाबत हाय कोर्टाने दिलेले निरीक्षण पाहण्याजोगे आहे.
जेलमध्ये असताना तब्बेत खराब होती आताही आहे.
कालच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे न्याय मंदिरावरील विश्वास आणखी वाढला आहे.
राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. लवकरच त्यांची भेट घेईल.
कटुता संपवली पाहिजे या फडणवीसांच्या विधानाचे मी स्वागत करतो.
दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहांना देखील भेटेल आणि सर्व गोष्टी सांगेल.




