Esha Deol : शाब्बास भावा! बंदर पाहिल्यानंतर बॅाबी देओलच्या बहिणीकडून कामाचं खास शब्दांत कौतुक
Esha Deol : या पोस्टमध्ये ईशाने चाहत्यांना चित्रपटगृहात जाऊन ‘बंदर’ पाहण्याचे आवाहनही केले. बहिणीच्या या प्रेमळ शब्दांबद्दल बॉबीनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत तिचे आभार मानले.

Esha Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा बहुचर्चित ‘बंदर’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी मुंबईत खास स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉबीची बहीण आणि अभिनेत्री ईशा देओलने उपस्थिती लावत भावाच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव केला.
चित्रपट पाहिल्यानंतर ईशा देओलने सोशल मीडियावर बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या देओलसोबतचा एक फोटो तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला. या पोस्टमध्ये तिने भावाने केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. “तू सध्या तुझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आहेस. माझ्या मते, तू आजच्या काळातील सर्वात बुद्धिमान अभिनेता आहेस. शाब्बास भावा!” अशा शब्दांत ईशाने बॅाबीचे कौतुक केले आहे. (Esha Deol)
या पोस्टमध्ये ईशाने चाहत्यांना चित्रपटगृहात जाऊन ‘बंदर’ पाहण्याचे आवाहनही केले. बहिणीच्या या प्रेमळ शब्दांबद्दल बॉबीनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत तिचे आभार मानले. (Esha Deol)
चित्रपटाबाबत बोलताना बॉबी देओल म्हणाला, “प्रत्येक अभिनेत्याला आपल्या अभिनयाची खरी क्षमता दाखवण्याची संधी मिळावी असं वाटतं. अशा भूमिका वारंवार मिळत नाहीत. ‘बंदर’मुळे मला ती संधी मिळाली, याचा मला आनंद आहे.” (Esha Deol )
हेही वाचा : K Annamalai : राजीनामा दिल्यानंतर के. अण्णामलाई यांची मोठी घोषणा! रजनीकांत यांचं नाव घेत केला खुलासा म्हणाले
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला ‘बंदर’ हा सत्य घटनांवर आधारित क्राईम-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात एका टीव्ही स्टारची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याच्यावर त्याच्या माजी प्रेयसीकडून गंभीर आरोप करण्यात येतात आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांभोवती कथानक फिरते. (Esha Deol )
चित्रपटात बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा, सपना पब्बी आणि सबा आझाद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाचा प्रीमियर टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता. आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षकांकडूनही बॉबीच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत असून, त्याच्या चाहत्यांनाही त्याची वेगळ्या प्रकारची भूमिका खूप आवडली आहे. (Esha Deol)
दरम्यान, ‘बंदर’नंतर बॉबी देओल यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या बहुप्रतीक्षित अॅक्शन चित्रपटात झळकणार आहे. YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट, शर्वरी आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Esha Deol)






