नांदुर ग्रामस्थांकडून PMPML बसचे ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत

Updated On:

नांदुर (ता. दौंड) – स्वारगेट उरूळी कांचन मार्ग नांदुर पीएमपीएमएल चे सहजपुर नांदुर येथिल ग्रामस्थांच्यावतीने उस्फूर्तपणे जंगी स्वागत करण्यात आले. नांदूर गावांमध्ये पीएमपीएल बस आल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम-ताशा च्या गजरामध्ये स्वागत केले.

बस सेवेचा प्रारंभ पीएमपीएल चे संचालक शंकरराव पवार नांदूर चे सरपंच लता थोरात उपसरपंच रविंद् बोराटे आदी मान्यवर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पीएमपीएलच्या डेपो मधील कर्मचाऱ्यांचे वाहनचालकांचा तसेच पीएमपीएल चालकाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी पवार म्हणाले, की नांदूर सहजपूर हा औद्योगिक पट्टा असून याठिकाणी बस चांगल्याप्रकारे सुरू राहिल्यास बसच्या आणखी फेऱ्या वाढवल्या जातील. ‘हात दाखवा बस थांबवा’ अशा सूचना त्यांनी वाहनचालकांना दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांनी पीएमपीएल बस सेवेचा लाभ घेऊन सहकार्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी सरपंच पोपटराव बोराटे यांनी केले. यावेळी पीएमपीएल वित्त लेखा अधिकारी योगेश होले, श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत, दहिटणे गावचे सरपंच बापूराव कोळपे, कैलास गायकवाड , ग्रामसेवक निलेश धारकर, नांदूर विविध कार्य सोसायटीचे चेअरमन पोपट बोराटे, शिवाजी मोटे, पोलिस पाटील धोंडीबा थोरात, भिमराव थोरात, रामदास गायकवाड, ज्ञानदेव बोराटे, प्रविण बोराटे, राजेश कोळपे, नवनाथ बोराटे, उमेश म्हेत्रे, पवार ऍग्रो सिसोर्ट च्या भाग्यश्री पवार, किसन थोरात, अशोक थोरात, विशाल घुले, दत्तात्रय बर्वे, विजय बोराटे, रामदास बोराटे, बबन बोराटे, विठ्ठल घुले, साहेबराव घुले, सुनील बोराटे, युवा कार्यकर्ते व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीएमपीएल डेपो साठी प्रयत्न करणार सुशांत दरेकर हडपसर ते यवत पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर यांच्या पाठपुराव्याला यश आले. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता यवत मार्गावर बससेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. या सेवा अधिक गतिमान करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी बोरीभडक तालुका दौंड या मध्यवर्ती ठिकाण आवर्ती बस डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पीएमपीएल बस सेवा चालू झाल्याने सहजपूर नांदूर व इतर परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पीएमपीएल बस सेवेचे वरिष्ठ पदाधिकारी यांचे या बस चालू करण्यासाठी खूप मोठे योगदान लाभले आहे. यावेळी पोलीस पाटील नेहा प्रवीण बोराटे सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

पीएमपीएल बस सेव चालु झाल्याने नांदुर सहजपुर व इतरत्र परिसरा मधील नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच औद्योगिक मधील काम करणारे कर्मचार्‍यांसाठी बस सेवा सोयीस्कर झाली आहे. तसेच पीएमपीएल अध्यक्ष राजेंद्र जगताप व सर्व पदाधिकारी यांचे मी नांदुर ची लेक म्हणून आभार मानते, असे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटले.

आणखी संबंधित बातम्या

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

2026-08-23 08:01:35

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

2026-08-23 07:33:51

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

2026-08-22 21:42:18

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

2026-08-22 20:33:14

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा